भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध डाॅ अमित नेमाणे

 भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध 

                   डाॅ अमित नेमाणे 


वाचकहो नमस्कार ! उत्तरोत्तर माझ्या लिखाणाला मिळणारा प्रचंड वाढता प्रतिसाद पाहून लिखाणाची हुरूप वाढत जाते . मध्यंतरी भारत-चीन संबंध व दुसऱ्या महायुद्धा संदर्भात लिहिलेल्या लेखाला अनेकांनी सुंदर प्रतिसाद दिला . देश आणि देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध हा अगदी रोचक विषय आहे , असे वाचकांनी कळविले म्हणून भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयी आपण येथे चर्चा करू (अर्थात चर्चा म्हणजे माझ्या लेखाला तुम्ही दिलेला प्रतिसाद अपेक्षित आहे )

     मित्रांनो सध्या आपले चीनशी सीमेवरील संबंध हे तणावाचे आहेत ,हे आपण सर्वजण रोजच पाहत ,वाचत असाल .लडाख या आपल्या केंद्रशासित प्रदेशाच्या पेंगोंग सु लेक या सीमावर्ती भागात आपला चीनशी वाद सुरू आहे . त्याचा पूर्व इतिहास बघितला तर काहीशे वर्षांपूर्वी लडाख हा भाग तिबेटमध्ये समाविष्ट होता . लडाख मधील लोकांची राहणी ,बोलणे ,खाने-पिने हे तिबेटीयन सारखेच आहे , परंतु इंग्रज राजवटीच्या कालावधीत जम्मू काश्मीर लडाख चा राजा आणि इंग्रजांन मध्ये करार झाला आणि लडाख म्हणजेच अक्साई चीन व तिबेट यांमध्ये सीमारेषा आखण्यात आली . म्हणजे थोडक्यात तिबेटचा एक भाग लडाखच्या स्वरूपात भारतात समाविष्ट झाला . कालांतराने 1952 मध्ये चीनने विस्तारवादी धोरणानुसार तिबेटला बळकावून चीनमध्ये समाविष्ट केले . केवळ तिबेटचा भाग असल्या कारणाने लडाखवर देखील चीनचे दावे सुरू झाले . 1961 मध्ये अक्साई चीन हा लडाख चा भूभाग भारत-चीन युद्धात चीनने बळकावला . मुळात संपूर्ण लढाख क्षेत्र काबिज करण्याचा मनसुबा त्या भारत-चीन युद्धात चीन्यांचा होता . भारत नुकताच स्वतंत्र झालेला देश होता . भारतीय संरक्षण यंत्रणा त्या काळी एवढी बलाढ्य नव्हती याचे कारण म्हणजे नेहरूंनी भारत तटस्थ भूमिका बजावणारा देश (नॉन ऑलाइन्ड ) राहील असे जाहीर केले होते . म्हणजे थोडक्यात भारत कुठल्याही देशाशी वाद करणार नाही व इतर देशांच्या वादात घुसनार नाही , हे मत नेहरूंनी जगासमोर मांडले होते.

      मुळात याच मतामुळे संरक्षण विभागाला आपण प्राथमिकता दिली नाही . त्याचेच नुकसान 1961 च्या भारत-चीन युद्धात भारताला झेलावे लागले . त्यात " ज्या प्रदेशात काहीच पीकत नाही तो प्रदेश चीनकडे गेला " असे काहीसे मत त्याकाळी नेहरूंनी व्यक्त केल्यानंतर , विरोधी पक्षांमध्ये एक ना खुशीची लहर तयार झाली आणि त्यातूनच पुढे नेहरूंच्या मृत्यूनंतर , संरक्षण विभागाला सशक्त बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले . नेहरूंनंतर आलेल्या लालबहादूर शास्त्रींनी बऱ्यापैकी संरक्षण यंत्रणेवर भर दिला , परंतु 1965 भारत पाकिस्तान युद्ध नंतर , समझोत्यासाठी ताश्कंद ला गेले ते त्यांचे संशयास्पद मृत पार्थिव भारतात परतले . 

     थोडक्यात चीनने भारताचा त्याकाळचा कमकुवतपणा हेरूनच  अक्साईचिन (लडाख ) प्रदेश युद्धामध्ये काबिज करून घेतला होता. 

  मुळात विस्तारवादी चीनचे म्हणणे असे आहे , की तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग आहे आणि तिबेट हा जर हात असेल तर लडाख ,नेपाळ ,सिक्कीम ,भूतान आणि अरुणाचल प्रदेश हे त्या हाताची पाच बोटे आहेत . हात म्हणजेच तिबेट , जर आमच्याकडे असेल ,तर हाताची पाचही बोटे आम्हालाच हवीत ( मोओ झिडॅाग नुसार ) आणि त्याच विचारधारेवर शांतपणे आक्रमकतेने चीन गेली अनेक वर्ष चाल करीत आहे . 15 त्रिल्लियन एवढ्या मोठ्या विशाल ( भारतापेक्षा सहापट मोठी ) अर्थव्यवस्था असलेल्या चीन हा देश इतर देशांवरती कर्जाचे जाळे टाकतो आणि त्या देशातला भूभाग लष्करी तळासाठी वापरतो , हे आत्तापर्यंत सिद्ध झाले आहे . तुफान आर्थिक ताकद असलेला चीन हा देश जगातल्या शक्य तितक्या देशांना आपल्या आर्थिक जाळ्यात ओढतो आहे . त्यात आपल्या शेजारी देशांचा नारळ केव्हाच फुटला आहे.

       पाकिस्तान ,श्रीलंका ,नेपाळ ,सिंगापूर, इराण ,जीबुटी ,मंगोलिया किंवा यांसारखे आणखी काही देश हे चीनच्या आर्थिक कर्जाच्या जाळ्यात फसलेले आत्तापर्यंतचे देश आहेत . यांसारखे छोटे देशच नव्हे तर रशिया सारखा जगातील सर्वात मोठा देश देखील चिंनच्या अप्रत्यक्ष जाळ्यात फसला आहे ही गोष्ट काही निष्णात आंतरराष्ट्रीय तज्ञ जाणतात.

    मुळात भारतापुढे चीनचे न पेलवणारे आव्हान फार प्रचंड आहे , त्याच बरोबर टू फ्रंट वाॅर होण्याची शक्यता भारतापुढे आ वासून उभी आहे . दुसऱ्या बाजूला पाकिस्तान कुरघोडी करीत आहे . मुस्लिम देशांचा प्रमुख होऊ पाहणाऱ्या तुर्की ,मलेशिया हे देश सोडले तर आखाती प्रदेशात किंवा मध्य आशियात पाकिस्तानला भारताविरोधात पाठिंबा देणारे देश नाहीत . अर्थातच चिनचा अपवाद वगळला तर . ज्या  सौदी अरेबिया देशावर पाकिस्तान त्यांचा आर्थिक गाडा पुढे ढकलतो , त्या सौदीच्या प्रिन्स चे संबंध भारताशी न भूतो न भविष्यती इतके चांगले आहेत असे दिसते . भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना सौदीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिल्याने ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे आणि जर सौदी भारताला पाठिंबा देत असेल , तर इतर आखाती देश नेहमीच सौदीचे अनुकरण करतात , या सूत्रानुसार त्यांचाही भारताला अप्रत्यक्ष पाठिंबाच असल्याचे जाणवते. 

     भारताचे आणि नेपाळचे संबंध पूर्वापार चांगलेच आहेत , मात्र मध्यंतरी त्यांचे साम्यवादी पंतप्रधान के पी ओली शर्मा हे चिन्यांच्या बरेच जवळ गेल्याचे लक्षात येते . कधी नव्हे तो लीप्या धुरा ,कालापानी , लिंपु लेक हे भारताचे भूभाग नेपाळचे असून , त्याचा नकाशा देखील नेपाळने परस्पर युनायटेड नेशन्स ला पाठविला , तो ह्याच चीन्यांच्या पाठिंब्याने  !

       भूतान मुळात गरीब देश ! हिंदू - बौद्ध संस्कृतीचे भारतीय साम्य असल्याने , भारत आणि भूतान यांचे संबंध बर्‍यापैकी सलोख्याचे आहेत . मात्र यामुळेच की काय भुतांचा काही भाग चीनचा असल्याचा हास्यास्पद दावा देखील चिन ने नुकताच केला आहे. 

     बांगलादेश आणि भारत खुली आंतरराष्ट्रीय सीमा असल्याने भारत-बांगलादेश यापूर्वी व्यापारीजोडीदार आहेत आणि भविष्यात देखील ते राहतील . 

  ह्या सर्व देशांमध्ये साम्यवादी सरकार आणून त्यांचा भारता विरोधी सूर काढण्याचा चीनचा प्रयत्न हा नेहमीच सुरू राहील याबाबत शंका नाही.

        चीन ,पाकिस्तान ,उत्तर कोरिया ,रशिया ,इराण ,नेपाळ ही एक फळी तयार होत असताना दिसते आहे , तर त्याविरोधात भारत ,अमेरिका ,जपान ,साऊथ कोरिया ,ऑस्ट्रेलिया ,फ्रान्स हे देश एकवटताना दिसतात.  फ्रान्स, ब्रिटन सोडला तर युरोपियन देशांचा चीन विरोध केवळ व्यापारी स्तरावरती असल्याचे जाणवते .  ( अगदी आत्ता हा लेख लिहीत असताना जर्मनीसारख्या बलाढ्य युरोपीय देशानी देखील दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या नीतीला विरोध करून भारताला पाठिंबा दिल्याचे समजते )

      केवळ " स्वतःच्या देशाचा फायदा " हे एकविसाव्या शतकातील आंतरराष्ट्रीय देशांचे मैत्रीचे सूत्र दिसते . तरी इजराइल सारखा यहुदी वासियांचा देश मात्र सातत्याने भारताला पाठिंबा देत असतोच , तेव्हा भारताची लष्करी ताकत अचानक वाढल्याचेही जाणवते ( मोसाद ही इजराइलची , जगातील सर्वात बलाढ्य लष्करी यंत्रणा मानली जाते )

     मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे इतर देशांशी द्विपक्षीय संबंध हे विविध विषयांवर अवलंबून असतात , परंतु काळा बरोबर हे चित्र देखील बदलत जाते . याचे उदाहरण म्हणजे जगातील पहिल्या अनुबॉम टाकलेला अमेरिका देश आणि त्यांनी ज्या देशावर अनुभव टाकला तो जपान आजच्या युगात घनिष्ठ मित्र झाले नसते !! 

   योग्य वेळी योग्य नीतीचा अवलंब करत भारताने आपले आंतरराष्ट्रीय वजन कायम राखले आहे , हे महत्त्वाचे !! 

                          - डॉ अमित वा नेमाणे

Comments

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे