Posts

Showing posts from August, 2020

लिटिल बाॅय ची पंचाहत्तरी....

लिटिल बॉय ची पंचाहत्तरी...                              - डॉ अमित नेमाणे    आज सहा ऑगस्ट . सकाळचे ९.४५ झाले आहेत , ह्याच वेळी ७५ वर्षांपूर्वी जपान देशाच्या हिरोशिमा या शहरावरती अमेरिकेने अणुबाँब चा हवाई हल्ला केला .लिटिल बॉय असे या ऑपरेशनचे नामकह अमेरिकेने केले होते . परंतु घ्या लिटिल बॉय ने जपानचे कंबरडेच मोडले . मानवी इतिहासात कृत्रिमरीत्या अणु हल्ल्याची ही पहिलीच वेळ होती , जुलै महिन्याच्या मध्यार्धात ह्या लिटिल बाईची अणुचाचणी अमेरिकेने केली होती आणि ह्या अणु हल्ल्यापूर्वी अमेरिकेने इंग्लंडला देखील या हल्ल्याची पुर्वकल्पना दिली होती . दुसऱ्या महायुद्धाची सांगता ह्या आणि त्यानंतरच्या आणखी एका अणुबाँब ने झाली. १५ ऑगस्ट १९४५ ला जपानने युद्धात माघार घेतली आणि दुसर्‍या महायुद्धात इंग्लंड ,अमेरिका ,रशिया ,फ्रान्स या मित्र राष्ट्रांचा विजय झाला . पुढे हाच १५ ऑगस्ट विजय दिवस असल्याने ब्रिटिशांनी देखील भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य देताना ह्याच १५ ऑगस्ट ची निवड केली.      दुसऱ्या महायुद्धात अण...