#wakeupparents#
#wakeupparents# # पालकांनो जागे व्हा# - डाॅ अमित नेमाणे. नमस्कार मित्रांनो ! कसं चाललय लाॅक डाऊन? बरेच दिवस झाल्याने आता आपल्याला बऱ्यापैकी घरी राहण्याची सवय झाली असेल किंबहुना आपल्या पैकी बऱ्याच लोकांनी आपली स्वतःची दिनचर्या देखील ठरविली असेल . असो ! आजवर मी अनेक लेख लिहिले आणि प्रसिद्ध देखील केले . सर्वांच्या प्रतिक्रिया त्यावर मला नियमित मिळत असतात , आपणा सर्वांचे आभार !! आजचा विषय अगदीच पोटतिडकीने मांडावासा असा आहे..... काही वेळापूर्वी बातम्या वाचत असताना , अचानक एक अतिशय हीन दर्जाची बातमी वाचली आणि एक पालक म्हणून माझे मन अगदी खिन्न झाले . दिल्लीमध्ये काही मुलांनी इंस्टाग्राम नावाच्या सोशल मीडिया वरती बॉइज लॉकर रूम नावाचा एक चॅट ग्रुप बनविला आणि त्या ग्रुप वर अनेक मुलीं विषयी , महिलांविषयी अतिशय अश्लाघ्य शब्दांमध्ये ते नियमित चर्चा करत असल्याचे उघड झाले , आश्चर्य तर तेव्हा वाटले जेव्हा हे कळाले की ती सर्व मुले अठरा वर्ष वयापेक्षा लहान म्हणजे...