Posts

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....   मित्रांनो , कृत्रिम दंत रोपण ही प्रक्रिया तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकली असेल. कृत्रिम दंतारोपण म्हणजे, एकही दात नसलेल्या किंवा दात नसलेल्या रुग्णांच्या जबड्यामध्ये कृत्रिम रित्या पुन्हा दात बसवणे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याची कल्पना असेल .या कृत्रिम दंतरोपण प्रक्रियेमध्ये, साधारणता ज्या पद्धतीने एखाद्या भिंतीमध्ये आपण स्क्रू लावत असतो, त्याच पद्धतीने जबड्याच्या हाडांमध्ये हा स्क्रू लावला जातो आणि त्या स्क्रूच्या ज्या थ्रेड किंवा त्या स्क्रूच्या अटी असतात त्यामध्ये हाड हळूहळू वाढायला सुरुवात होते ,याला आम्ही म्हणतो इंटिग्रेशन म्हणजे थोडक्यात काय जबड्याच्या हाडांमध्ये टाकलेल्या कृत्रिम स्कूल ला हाडाने आपलेसे करून घट्ट करणे ही ती प्रक्रिया असते, साधारणता दोन ते तीन महिन्याचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागतो. जबड्याच्या हाडांमध्ये टाकलेल्या स्क्रू हा घट्ट झाला आहे याची खात्री पटली, की आपण त्याच्यावरती दात बसवितो....

गुरू विना ज्ञान सांग कैसे? - डॉ अमित वामन नेमाणे

 मित्रांनो, आज आषाढी पौर्णिमा! आपण आषाढी पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतो. याच दिवशी आपण गुरुपौर्णिमा देखील साजरी करतो. आपण अगदी लहानपणापासून ,शाळेत असल्यापासून ,गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक भाषणे ऐकले असतीलच किंबहुना केली देखील असतील. गुरूंचे जीवनात असलेले महत्त्व , आपण बऱ्याचदा वाचले आहे किंवा अनुभवले देखील आहे किंवा त्यावर आपण चिंतन देखील केले असेल. गुरु शिष्याच्या अनेक जोड्या आपण भाषण देताना केलेल्या तयारीमध्ये वाचल्या देखील असतील, परंतु मित्रांनो एवढ्या वरतीच गुरुपौर्णिमा संपविता येईल का? गुरु पौर्णिमेचे महत्व ,हे अगदी बोली भाषेमध्ये मांडायचे असेल तर ते आपल्या अधिक समजेल ,असे मला वाटते , केवळ त्याच त्या भाषांमध्ये त्याच त्या प्रत्येक वर्षीच्या गुरुपौर्णिमेस वाचलेली तीच ती माहिती पुन्हा पुन्हा वाचणे सांगणे किंवा ऐकणे हे थोडेसे प्रभावहीन जाणवते! अशा परिस्थितीमध्ये आपण उर्वरित लेखाकडे पाहुयात,      मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना आपण एक रेफरन्स पॉईंट कायम डोक्यात ठेवत असतो. त्या रेफरन्स पॉईंटला उद्देशून किंवा प्रमाण मानून आपण स्वतःचे किंवा आप...

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

 समाजामध्ये डॉक्टरांची संख्या जरी वाढली असली तरी आपणास योग्य डॉक्टर निवडण्याचे जनतेसमोर नवे आव्हान उभे आहे!!   नमस्कार मित्रांनो मी गेले अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करीत आहे . अनेक रुग्ण येतात वेगवेगळे बरे-वाईट अनुभव सांगतात ,आश्चर्यकारक किंवा तेवढेच चित्तथरारक रुग्णांचे अनुभव देखील ऐकावयास मिळतात .डॉक्टर मंडळी देखील एकत्र बसली की डॉक्टरांकडून अनेक अनुभव ऐकावयास मिळतात किंवा OPD मध्ये पेशंट वर देखील असे अनेक प्रसंग ओढावतात. मध्यंतरी डॉक्टरांवर होणाऱ्या काही हल्ले चिंताजनक आणि निशंक निषेधार्ह होतेच याबाबत तिळमात्र शंका नाही, मात्र रुग्णांच्या काही व्यथा देखील लक्षणीय आहेत . डॉक्टरांनी योग्य वेळी योग्य सल्ला न दिल्याने प्राण गमावलेले किंवा विकलांग झालेले रुग्ण देखील समाजामध्ये दिसतात, डॉक्टरांना देव मानणारा हा समाज बऱ्याचदा डॉक्टरांच्या चुकीमुळे डोळ्यातून पाणी गाळताना देखील दिसत असतो, अशा वेळी डॉक्टरांचा कोप वगैरे झाला का? असे म्हणावे का ? असा प्रश्न पडतो .परंतु रुग्ण मित्रांनो आपल्या वरती काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर योग्य डॉक्टर निवडणे फार गर...

भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी !!

भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी !                           डॉ अमित नेमाणे  नमस्कार मित्रांनो ! एका नवीन विषयावरती बोलूयात , मध्यंतरी एक बातमी आली जी आपण सातत्याने वाचत आहोत , वृत्तपत्रांमध्ये देखील आपण ती वाचत असाल . जागतिक नकाशा मध्ये असलेल्या अनेक छोट्यामोठ्या देशांमध्ये सातत्याने वाद-विवाद चालूच असतात . दोन देश जर एकमेकांची सीमा लागून असेल , तर त्यांच्यामध्ये हमखास कुठल्या न कुठल्या विषयावरती विवाद असतोच . आता आपण ऐकले असेलच की इजरायल आणि पॅलेस्टाईन या दोशन या दोन देशांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद चालू आहे आणि त्याचे एका युद्धभूमी मध्ये रूपांतर झाले आहे . आजकाल युद्धे तुल्यबळ असून प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्याऐवजी ते जागतिक राजकीय पटलावर जास्त त्वेषाने लाढली जातात . आपण बऱ्याचदा हे पाहिले असेल की , जगामध्ये दोन देश ज्या वेळेस एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात ,त्याच वेळेस संपूर्ण जग देखील दोन विचार प्रवाह मध्ये विभागले जाते . सध्या असलेला विवाद म्हणजे इजरायल आणि पॅलेस्टाईन नावाच्या दोन देशांमधला आहे . इ...

मानवी जीवन आणि प्रेशर कुकर.........

 मानवी जीवन आणि  प्रेशर कुकर......     डाॅ अमित वामन नेमाणे     नमस्कार वाचक मित्रांनो ! आज आपण एक विशिष्ट विषयावर बोलूयात , साधारणत:  ‘ अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर ‘  हे सावरकरांचे लिखाण वाचत असताना "प्रेशरकुकर " ही संकल्पना मला सुचली आणि त्याचे माणसाच्या आयुष्याची असलेले तांत्रिक नाते देखील स्पष्ट होऊ लागले . रजनीश नावाच्या अोशो आश्रम चालविणाऱ्या एका तत्त्ववेत्त्याने देखील अशाच प्रकारच्या जगण्याच्या पद्धती मध्ये "प्रेशर कुकर " संकल्पनेला महत्त्व दिल्याचेही दिसून येते.       आयुष्य जगताना माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येतात , हे सांगण्यासाठी तुम्हाला फार मोठा तत्ववेत्ता असण्याची गरज नक्कीच नाही , मात्र तुम्ही बघितले असेल एखादा प्रचंड शांत स्वभावाचा व्यक्ती किंवा अगदी मितभाषी असणारा व्यक्ती असतो चिडतो तेव्हा प्रचंड गरजळ अोकतो ,  त्याच्या मनातली भडास काढतो . आपण नियमित अशा व्यक्तींना असे म्हणतो की , हा शांत स्वभावाचा माणूस चिडला की फारच चिडतो वैगेरे ... त्या विपरीत एखाद्या बडबड्या व्यक्ती हा विशेष त्र्यागा करीत नाही . थ...

दातांमध्ये फट पडत आहे का ? मग जरूर वाचा दंतरोग तज्ञ आणि वक्ते डॉ अमित नेमाणे यांचा लेख !

 दातांमध्ये फट पडत आहे का ? मग जरूर वाचा दंतरोग तज्ञ आणि वक्ते  डॉ अमित नेमाणे यांचा लेख !     नमस्कार मित्रांनो ! आपण आजवर अनेक विषयांवर चर्चा केली आहे , दातांच्या समस्यांपासून ते आरोग्याच्या अनेक समस्यांवर माझे अनेक लेख देखील प्रसिद्ध झाले आहेत .नुकतेच आंतरराष्ट्रीय कॅन्सर दिनानिमित्त घेतलेल्या कर्करोग तपासणी शिबिराला आपण अगदी भरभरून प्रतिसाद दिला , त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार ! आजच्या विषयाकडे वळूयात......    अनेक पेशंट , दंतरोग तज्ञांना विचारणार्‍या प्रश्नांपैकी एक अतिसामान्य प्रश्न म्हणजे , " डॉक्टर साहेब , दातांमध्ये अनेक फटी पडत आहेत ! काय करावे बरं ? "     सर्वप्रथम आपण दातांमध्ये फट पडण्याची कारणे बघूयात . काही कारणे नैसर्गिक असतात , म्हणजे नैसर्गिक दातांमध्ये फटी ( गॅप ) असणे याला स्पेसिंग असे म्हणतात. अशा केसेसमध्ये दातांना तारा लावणे / ब्रेसेस लावुन फटी बंद करता येतात . मुळात हा आजार नव्हे ! साधारण वर्षभराचा कालावधी लागू शकतो . हाडांची आणि दातांची अपरिपक्वता किंवा काही जणुकीय आजार ही देखील काही कारणे आहेत . आता पाहूयात पॅथॉल...

आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू...............

 आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू ...............                                 डॉ. अमित नेमाणे नमस्ते मित्रांनो ! आजचा लेख लिहिण्यासाठी  बरेच दिवस थांबावे लागले ,दरम्यान आपणा सर्वांचे निरोप येत होतेच ,त्याबद्दल धन्यवाद !! मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जातो , त्यावेळी अनेक लोक अनेक प्रश्न , शंका विचारतात , त्या सर्व प्रश्नांची , शंकांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी मला बरेचसे वाचन नियमित करावे लागते , तसेच वाचन करताना फार सुंदर कल्पना ,विचार सुचतात आणि तात्काळ त्यांपैकी एखाद्या विषयावर आपण लेख लिहावासा देखील वाटते , त्यापैकीच आजचा विषय म्हणजे " आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू...."        साधारणतः कोणतीही व्यक्ती एका विशिष्ट व्यक्तिमत्त्वाशी बांधील असते , आपणा सर्वांना बरोबर देखील हेच असेल . उदाहरणादाखल आपल्या प्रत्येकाचा विशिष्ट स्वभाव ,विशिष्ट वागणे-बोलणे , पेहराव अगदी विशिष्ट DNA प्रमाणे  एकमेवद्वितीय असते. प्रत्येकाची एक विशेष ओळख अ...