भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी !!
भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी ! डॉ अमित नेमाणे नमस्कार मित्रांनो ! एका नवीन विषयावरती बोलूयात , मध्यंतरी एक बातमी आली जी आपण सातत्याने वाचत आहोत , वृत्तपत्रांमध्ये देखील आपण ती वाचत असाल . जागतिक नकाशा मध्ये असलेल्या अनेक छोट्यामोठ्या देशांमध्ये सातत्याने वाद-विवाद चालूच असतात . दोन देश जर एकमेकांची सीमा लागून असेल , तर त्यांच्यामध्ये हमखास कुठल्या न कुठल्या विषयावरती विवाद असतोच . आता आपण ऐकले असेलच की इजरायल आणि पॅलेस्टाईन या दोशन या दोन देशांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद चालू आहे आणि त्याचे एका युद्धभूमी मध्ये रूपांतर झाले आहे . आजकाल युद्धे तुल्यबळ असून प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्याऐवजी ते जागतिक राजकीय पटलावर जास्त त्वेषाने लाढली जातात . आपण बऱ्याचदा हे पाहिले असेल की , जगामध्ये दोन देश ज्या वेळेस एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात ,त्याच वेळेस संपूर्ण जग देखील दोन विचार प्रवाह मध्ये विभागले जाते . सध्या असलेला विवाद म्हणजे इजरायल आणि पॅलेस्टाईन नावाच्या दोन देशांमधला आहे . इ...