Posts

Showing posts from April, 2020

कोरोना लाॅक डाउन ........डाॅ अमित नेमाणे

"कोरोना लाॅक डाऊन !  "...........                                     डाॅ अमित नेमाणे निसर्ग हा आपली जहागीर असून आपण त्याचा मनमुराद आनंद लुटू शकतो ,अगदी निसर्गाची हानी होईपर्यंत, अशा आविर्भावात वावरणाऱ्या पृथ्वीवासीयांना निसर्गाने अगदी चांगलाच धडा शिकवला तो करोना विषाणूच्या स्वरूपात. घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या जगाला घड्याळातील सेल काढून ठेवल्याप्रमाणे कैद केले ,ते ह्याच कोविड १९ आजाराने . आज जवळपास संपूर्ण जग "लोक डाऊन "ह्या संज्ञेचा खऱ्या अर्थाने उपरोधिक आनंद लुटत आहे .अशा या बंदच्या परिस्थितीत एका बंद घराच्या बंद खोलीत लिहिलेला हा लेख .लेखन करीत असताना एक कबुतर ,काही चिमण्यांचे थवे ,काही कावळे खिडकीमधून आत कोंडलेल्या माझ्याकडे डोकावून बघताना , ते मला हिनावत आहेत की काय असाच भास होतोय ! असो !! साधारणत काही महिन्यापूर्वी चीन देशात या आजाराची सुरवात झाली असे म्हणतात . नेमकी तारीख किंवा महिना सांगता येत नाही कारण मुळातच साम्यवाद किंवा कम्युनिजम सारख्या संकल्पनातुंन एखाधिकार शाही सारख...

माझ्या जीवनाचा शिल्पकार...... डाॅ अमित नेमाणे

माझ्या जीवनाचा शिल्पकार !!                                  डाॅ अमित नेमाणे. अगदी काल-परवा ची गोष्ट आहे , नेहमीप्रमाणे दवाखान्यात बसलो होतो , माझ्या डेंटल क्लिनिक ला पेशंटची बरीच वर्दळ असते ,अगदी पेशंटशी संवाद साधताना सतत चालणारा माझा तोंडाचा दांडपट्टा एक दहा मिनिटांसाठी थांबला आणि समोरच्या वर्तमानपत्रावर नि नजर टाकली तितक्यात कोणी एक इसम साधारणतः 60 वर्षाची असावेत क्लिनिकचा दरवाजा ठोठावून आत आले ते ,"नमस्कार डॉक्टरसाहेब ! " आवाजा मध्ये कमालीचा आदर पूर्वक भावना , पांढर्‍या रंगाचा शर्ट , करड्या रंगाची जरीची कळकट वाटणारी पॅन्ट, उजव्या हातात निळसर छटा असलेला रूमाल , बहुदा सतत घडी मोडल्यामुळे तो रुमाल बराचसा अस्ताव्यस्त झाला होता ,गोरा वर्ण ,डोक्यावर तुरळक केस आणि रुबाबदार मिशी ,जेणेकरून संपूर्ण त्यांच्या पेहराव यात केवळ मीशीच त्यांच्या रुबाबदार पणाची साक्ष देत होती .माझ्या मनात मी त्याक्षणी पुटपुटलो , " कुलकर्णी सर !! " .मी विषय पुढे नेत म्हणालो , "बसा ना सर ! " .सरांनी मला ओळखले होते परंतु ते माझी तोच...