गुरू विना ज्ञान सांग कैसे? - डॉ अमित वामन नेमाणे
मित्रांनो, आज आषाढी पौर्णिमा! आपण आषाढी पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतो. याच दिवशी आपण गुरुपौर्णिमा देखील साजरी करतो. आपण अगदी लहानपणापासून ,शाळेत असल्यापासून ,गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक भाषणे ऐकले असतीलच किंबहुना केली देखील असतील. गुरूंचे जीवनात असलेले महत्त्व , आपण बऱ्याचदा वाचले आहे किंवा अनुभवले देखील आहे किंवा त्यावर आपण चिंतन देखील केले असेल. गुरु शिष्याच्या अनेक जोड्या आपण भाषण देताना केलेल्या तयारीमध्ये वाचल्या देखील असतील, परंतु मित्रांनो एवढ्या वरतीच गुरुपौर्णिमा संपविता येईल का? गुरु पौर्णिमेचे महत्व ,हे अगदी बोली भाषेमध्ये मांडायचे असेल तर ते आपल्या अधिक समजेल ,असे मला वाटते , केवळ त्याच त्या भाषांमध्ये त्याच त्या प्रत्येक वर्षीच्या गुरुपौर्णिमेस वाचलेली तीच ती माहिती पुन्हा पुन्हा वाचणे सांगणे किंवा ऐकणे हे थोडेसे प्रभावहीन जाणवते! अशा परिस्थितीमध्ये आपण उर्वरित लेखाकडे पाहुयात, मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना आपण एक रेफरन्स पॉईंट कायम डोक्यात ठेवत असतो. त्या रेफरन्स पॉईंटला उद्देशून किंवा प्रमाण मानून आपण स्वतःचे किंवा आप...