Posts

Showing posts from July, 2020

New education policy 2020

नवीन शिक्षण धोरण 2020 जाहीर झाले आहे या शैक्षणिक धोरणात झालेल्या बदलाचा संबंध हा आपल्या सर्वांशी आहे . या नवीन शिक्षण धोरण 2020 मधील काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे . १) भारताच्या एकूण जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करण्याचा निर्णय (पूर्वी हा खर्च 2.7 टक्के एवढाच व्हायचा) २) अर्धवट शिक्षण सोडलेल्या दोन करोड विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाकडे वळवण्याचा निर्णय ३) वर्ष 2030 पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण देण्याचा प्रयत्न ४) नवीन शिक्षण प्रणाली पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार याप्रमाणे आखली जाणार ५) लिखाण आणि वाचन हे प्रत्येक विद्यार्थ्याला आलेच पाहिजे असे धोरण आखले जाणार ६) कला ,वाणिज्य ,विज्ञान या वेगवेगळ्या शाखांमधला फरक कमी केला जाणार ७) एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वर लक्ष केंद्रित करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार ८) इयत्ता सहावी नंतर व्यवसायिक शिक्षणाला प्राधान्य देण्याचा विचार ९) इयत्ता सहावी नंतर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचा अनुभव येण्यासाठी इंटर्नशिप चालू करणार १०) सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत घेण्याची संधी उपलब्ध होणार...

अर्थकारण स्त्रीदाक्षिण्याचे........... डाॅ अमित नेमाणे

अर्थकारण स्त्रीदाक्षिण्याचे...........                                     डाॅ अमित नेमाणे        कोरोना विषाणू मुळे जगाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे , या जागतिक महामारी चे अनेक खोलवर परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे हे सांगण्यासाठी कोणी अर्थ पंडिताची गरज नाही . जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेला लोअर मिडल क्लास मध्ये वर्गीकरण केल्याचा रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला , मुळात अपर क्लास , अप्पर मिडल लोअर मिडल आणि लोअर क्लास असे काहीसे वर्गीकरणाचे स्वरूप विश्व बँक मांडते त्यात भारतीय अर्थव्यवस्था ही शेवटून दुसरी म्हणजे लोअर middle-class असल्याचेही स्पष्ट करते .वरील विश्व बँकेचे वर्गीकरण हे साधारणतः दरडोई उत्पन्न याला अनुसरून आहे ,म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रत्येक व्यक्ती व पर्यायाने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न यामध्ये मोजले जाते . उपरोक्त मापदंडानुसार भारतीय लोक फारच सुमार समजली जाणारी कमाई करतात..... वरील माहिती वाचल्यानंतर काही आणखी अर्थकारणासंबंधित शोधनि...