New education policy 2020

नवीन शिक्षण धोरण 2020 जाहीर झाले आहे या शैक्षणिक धोरणात झालेल्या बदलाचा संबंध हा आपल्या सर्वांशी आहे . या नवीन शिक्षण धोरण 2020 मधील काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे .
१) भारताच्या एकूण जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करण्याचा निर्णय (पूर्वी हा खर्च 2.7 टक्के एवढाच व्हायचा)
२) अर्धवट शिक्षण सोडलेल्या दोन करोड विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाकडे वळवण्याचा निर्णय
३) वर्ष 2030 पर्यंत शंभर टक्के विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण देण्याचा प्रयत्न
४) नवीन शिक्षण प्रणाली पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार याप्रमाणे आखली जाणार
५) लिखाण आणि वाचन हे प्रत्येक विद्यार्थ्याला आलेच पाहिजे असे धोरण आखले जाणार
६) कला ,वाणिज्य ,विज्ञान या वेगवेगळ्या शाखांमधला फरक कमी केला जाणार
७) एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वर लक्ष केंद्रित करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार
८) इयत्ता सहावी नंतर व्यवसायिक शिक्षणाला प्राधान्य देण्याचा विचार
९) इयत्ता सहावी नंतर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचा अनुभव येण्यासाठी इंटर्नशिप चालू करणार
१०) सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेत घेण्याची संधी उपलब्ध होणार
११) विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक सर्वसमावेशक बनविणार . अशा प्रगती पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन बरोबर शिक्षकांचे देखील मूल्यमापन आणि सर्हविद्यार्थ्यांचा मतांचा विचार देखील करण्यात येणार
१२) किमान 50 टक्के विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यावे असे ध्येय २०३५ पर्यंत पूर्ण करणार
१३) उच्च शिक्षणासाठी साडे तीन करोड जागा वाढविणार
१४) उच्च शिक्षणामध्ये विषय निवडीची लवचिकत असनार उदाहरणार्थ फिजिक्सबरोबर सायकॉलॉजी किंवा इतर कुठलेही विषय आपल्या आवडीनुसार आपण अभ्यासू शकता
१५) मल्टिपल एक्झिट आणि एन्ट्री - पदवीचे अर्धवट शिक्षण सोडल्यानंतर त्या पदवीचे बेसिक सर्टिफिकेट मिळणार
१६) अर्धवट पदवीचे शिक्षण सोडल्यानंतर त्या अर्धवट स्वरूपात केलेल्याशिक्षणाचा क्रेडिट स्कोर आपल्या अकॅडमिक बॅलन्स ऑफ क्रेडिट मध्ये जमा होणार
१७) संशोधनासाठी राष्ट्रीय संशोधन संस्थेची स्थापना करणार
१८) उच्चस्तरीयशिक्षणासाठी असलेल्या अनेक वेगवेगळ्या गव्हर्मेंट बॉडी एका संस्थे खाली आणणार
१९) आफ्फिलिएशन सिस्टम बंद करणार वेगवेगळ्या विद्यापीठांतर्गत असलेल्या विद्यालयांना पुढील पंधरा वर्षात स्वायतत्ता देण्यावर भर
२०) शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमची स्थापना करणार
२१) मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जेंडर इन्कल्युजन फंड बनविणार
२२) वार्षिक परीक्षा केवळ इयत्ता तिसरी ,पाचवी ,आठवी मध्येच होणार . इतर इयत्तांमध्ये ग्रेड पद्धतीने विद्यार्थ्यांना पुढील इयत्तांमध्ये प्रवेश देण्यात येणार
२३) शिक्षकांचे प्रमोशन देखील मेरिट पद्धतीनेच होणार त्याचबरोबर शिक्षकांना प्रशासकीय आणि शैक्षणिक या दोन विभागांमध्ये विभागणी करून प्रशिक्षण दिले जाणार
२४) विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणासाठी प्रिस्कूल शिक्षकआणि अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार
२५) एकंदर शिक्षणाचा कल हा प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक शिक्षणाकडे झुकलेला असणार
वरील नमूद केलेल्या अशा अनेक बदलांमुळे भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल अपेक्षित असून देशातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा हा प्रचंड पद्धतीने उंचावण्याचा प्रयत्न या नवीन शिक्षण धोरणांमध्ये दिसून येतो. 
 वरील काही मुद्यांवर बदल असु शकेल .
सर्वांना ह्या नवीन धोरणाबद्दल माहिती मिळण्यासाठी वरील मुद्दे संकलित केले आहेत. 
डॉ अमित नेमाणे.

Comments

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे