बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....


  मित्रांनो , कृत्रिम दंत रोपण ही प्रक्रिया तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकली असेल. कृत्रिम दंतारोपण म्हणजे, एकही दात नसलेल्या किंवा दात नसलेल्या रुग्णांच्या जबड्यामध्ये कृत्रिम रित्या पुन्हा दात बसवणे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याची कल्पना असेल .या कृत्रिम दंतरोपण प्रक्रियेमध्ये, साधारणता ज्या पद्धतीने एखाद्या भिंतीमध्ये आपण स्क्रू लावत असतो, त्याच पद्धतीने जबड्याच्या हाडांमध्ये हा स्क्रू लावला जातो आणि त्या स्क्रूच्या ज्या थ्रेड किंवा त्या स्क्रूच्या अटी असतात त्यामध्ये हाड हळूहळू वाढायला सुरुवात होते ,याला आम्ही म्हणतो इंटिग्रेशन म्हणजे थोडक्यात काय जबड्याच्या हाडांमध्ये टाकलेल्या कृत्रिम स्कूल ला हाडाने आपलेसे करून घट्ट करणे ही ती प्रक्रिया असते, साधारणता दोन ते तीन महिन्याचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागतो. जबड्याच्या हाडांमध्ये टाकलेल्या स्क्रू हा घट्ट झाला आहे याची खात्री पटली, की आपण त्याच्यावरती दात बसवितो. ही सर्वसाधारण कृत्रिम दंतरोपणाची पद्धत आहे, मात्र ही पद्धत जरी लोकप्रिय असली तरी यामध्ये काही अडचणी असतात आणि अशा अडचणींचा विचार करूनच ही प्रक्रिया पूर्वनियोजित पद्धतीने केली जाते, मात्र या प्रक्रियेसाठी आपणास काही रुग्णांच्या हाडाच्या संरचनेची आवश्यकता असते ,जसे की रुग्णाच्या जबड्याच्या हाडांमध्ये किंवा जबड्याच्या हाडाची विशिष्ट रुंदी आणि विशिष्ट उंची असेल तरच ही प्रक्रिया शक्य होते. साधारणतः दहा मिलिमीटर उंची असावी किंवा अडीच ते तीन मिलिमीटर ची रुंदी असावी ,अशी काहीशी अपेक्षा असते आणि अशाच केसेसमध्ये केलेले इम्पलांट किंवा कृत्रिम दंतरोपण हे यशस्वी होते, मात्र समाजामध्ये अनेक असे रुग्ण आहेत ज्यांच्या जबड्याच्या हाडाची झीज ही प्रचंड असते आणि अशा रुग्णांमध्ये अशा पद्धतीने केलेले कृत्रिम दंतरोपण शक्य होत नाही, मात्र आता परिस्थिती बदललेली आहे . ज्या रुग्णांमध्ये जबड्याच्या हाडाची कमतरता आहे ,अशा रुग्णांमध्ये आपण आज कृत्रिम दंतरोपण करू शकतो . " बेसल किंवा कॉर्टिकल इम्प्लांटोलॉजी " या नावाने ही नवीन कृत्रिम दंतरोपण पद्धती यशस्वी होताना दिसत आहे. मित्रांनो, बेसल इम्प्लांटोलॉजी किंवा कोर्टीकल इम्प्लांट म्हणजे नेमके काय ? तर आपण जो सर्वसाधारण दंतरोपण करताना

 " स्क्रू " टाकत होतो ,तो जबड्याच्या कॅन्सलस बोनमध्ये म्हणजे जबड्याच्या मध्य भागामध्ये असलेल्या आवरणामध्ये टाकीत होतो ,असे हाड किंवा हाडाचे आवरण भूष्याप्रमाणे असते, असे हाड भविष्यामध्ये झिजण्यासाठी किंवा झिजण्याची शक्यता जास्त असते आणि हाड झिजल्यानंतर स्क्रू फेल होण्याची शक्यता जास्त असते . कॉर्टीकल इम्प्लांट म्हणजे आपण जर हा स्क्रू हाडाच्या भुशांमध्ये न टाकता जबड्याच्या हाडांच्या प्लेटमध्ये (कॉर्टीकल प्लेट मध्ये जे सहसा झिजत नाही) टाकला ,तर त्याची झीज अतिशय कमी किंवा जवळपास नसते . मित्रांनो, आपला जबड्याचा हाड हे दोन प्रकारच्या हडां पासून बनलेले असते, कॅन्सलस बोन आणि बेसल बोन, हे हाड बाळ आईच्या पोटामध्ये असतानाच तयार झालेले हाड असते आणि कॅन्सलस बोन (भुस्सा हाड )हे नैसर्गिक रित्या हळुवार पद्धतीने बनत असते , बेसल बोन इम्प्लांट हे हाडाच्या बेसल बोन ( यालाच कॉर्टिकल बोन देखील म्हटले जाते) या भागामध्ये टाकले जाते, अशा इम्प्लांटला त्याच्या थ्रेडमध्ये किंवा अट्यांमध्ये हाड वाढण्याची वाट पाहायची गरज लागत नाही, कारण ओशियो फिक्सेशन या पद्धतीने हाडा मध्ये फिक्स केला जातो, याच पद्धतीने अस्थिरोगतज्ञ शरीराच्या इतर हाडांमध्ये स्क्रू चा वापर करतात, त्याच पद्धतीने कॉर्टीकल इम्प्लांट देखील जबड्याच्या कॉर्टीकल बोन किंवा बेसलबोन मध्ये ओशिओ फिक्सेशनच्या माध्यमातून घट्ट होतात आणि अशा पद्धतीने बसविलेले कृत्रिम दात हे दीर्घकाळ टिकणारे असतात अर्थात या प्रक्रियेतील एक सुंदर गोष्ट म्हणजे संपूर्ण जबड्याचे कृत्रिम दंतरोपण हे तीन दिवसांमध्ये होणे शक्य आहे आणि अशा पद्धतीने बसविलेले कृत्रिम दात हे दीर्घकाळ म्हणजे पुढील अनेक वर्ष टिकू शकतात, याची देखील अनेकदा खात्री झालेली आहे .त्यामुळे ज्या पेशंटला पूर्वी कृत्रिम दंतरोपण शक्य नव्हते ,त्या पेशंटला आजच्या घडीला कृत्रिम दंतरोपण शक्य झाले आहे आणि ते अगदी सहज देखील झालेले आहे .वरील प्रक्रिया ही मुळात फार कमी भुले खाली केलेली असते त्यामुळे भुलप्रक्रियेचा विशेष त्रास देखील जाणवत नाही .साधारणतः खर्च हा तीन ते चार लाखांच्या दरम्यान असू शकतो आणि दात बसवण्याचा संपूर्ण कालावधी हा तीन ते चार दिवसांचा असू शकतो, ही प्रक्रिया करण्यापूर्वी विविध प्रकारचे एक्स-रेज आणि सिटीस्कॅन यांच्या माध्यमातून हाडांचे जबड्याच्या हाडाचे आणि जबड्याच्या हाडाच्या आत मध्ये असलेल्या विविध रक्तवाहिन्या आणि नसांचे परीक्षण केले जाते आणि त्याद्वारे उपचार पद्धती ठरविली जाते अशा पद्धतीने केलेले उपचार हे कमी वेदनादायी दीर्घकाळ टिकणारे असतात, त्यामुळे बेसल इम्प्लांट किंवा कॉर्टिकल इम्प्लांट द्वारे केले जाणारे दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदानच म्हणावे लागेल ,मात्र समाजामध्ये या प्रक्रियेबद्दल कल्पना असलेले रुग्ण फार कमी आहेत, वरील लेख हा अशा अनेक रुग्णांना कल्पना देण्यासाठी लिहिलेला आहे .डॉ अमित नेमाणे हे " बेसल कृत्रिम दंतरोपण " तंत्रज्ञानामध्ये विशेष पारंगत आहेत आणि अशा अनेक रुग्णांना त्यांनी कृत्रिम दंत रोपण करून हास्य दिलेले आहे. अशा कृत्रिम दंतरोपणाचा अनुभव भविष्य काळात अनेक रुग्णांना होईल हे मात्र नक्की.......

Comments

Popular posts from this blog

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे