Posts

Showing posts from October, 2020

आपला चार्जिंग पॉईंट ! - डाॅ नेमाणे अमित

आपला चार्जिंग पॉईंट !                                    - डाॅ नेमाणे अमित        वाचक मित्रांनो ,आज आपण स्वतः ला प्रोत्साहित ठेवण्याबद्दल बोलूयात ! प्रत्येकाची काही स्वप्ने असतात ,प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी मिळवायचं असतं , तर काही बनायचं असतं . हेच ते काहीतरी मिळवायचं ज्या वयात आपण ठरवतो ,तेव्हा आपाल्यामध्ये असलेला मानसिक ,शारीरिक ऊर्जा स्त्रोत देखील अथांग, अफाट असतो . मात्र जसजसे दिवस जातात ,महिने जातात , वर्ष उलटून जातात ,तेव्हा ती ऊर्जा कमी होते आणि आपल्या आयुष्यात जे हवे होते , जे करायचे होते ती गोष्ट मागे पडते , एक वेगळेच येवून ठेपलेले आयुष्य आपण जगत रहातो . असे काहीसे आपल्याला बरोबर झाले आहे का ?? किंवा आपल्याबरोबर होते का ? ८५ टक्के लोकांचे उत्तर होय असेच असेल !! कारण हाच ८५ टक्के समाज आहे , जो नियमित आपल्या नजरेस पडतो . अचानक आठवलं म्हणून नमूद करतो , परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय चळवळीचे प्रसारक आणि भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक होते , ते असं म्हणतात की समाजाम...

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे

 " बदलते पालक आणि पालकत्व "                                                                     - डाॅ अमित वा नेमाणे  नमस्कार मित्रांनो ! कोविड१९ च्या युगात , अचानक शरीरात प्रवेश केलेल्या मात्र अपेक्षित असलेल्या कोरोना विषाणू चा पाहुणचारात करन्यात मागचे काही दिवस गेल्याने, माझा कुठलाही लेख प्रसिद्ध होऊ शकला नाही .याबद्दल क्षमस्व!  अनेक वाचकांनी त्याबद्दल मध्यंतरी फोनवर विचारपूस देखील केली , त्याबद्दल आभार ! असो !!     वाचक मित्रांनो ,मी गेले अनेक वर्ष मोटिवेशनल स्पीकर म्हणून अनेक संस्था ,शाळा ,कंपन्यांमध्ये व्याख्याने देत आहे .मात्र शाळेमध्ये व्याख्यान देताना किंवा तिथल्या विद्यार्थी मित्रांशी संवाद साधताना किंवा त्यांच्या पालकांशी संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि सतत जाणवत राहते . ते म्हणजे , ज्या वेगाने विद्यार्थ्यांचा ,पर्यायाने पाल्यांचा मानसिक विकास होतो आहे ,तो वेग अफाट आह...