लिहिते व्हा ......
लिहिते व्हा ...... डॉ.अमित नेमाने नमस्कार मित्रांनो ! अनेक दिवस एक विषय मनामध्ये खदखदतोय त्याला शब्द रूप देण्याचा मुहूर्त आज मिळाला मी गेले तीन ते चार वर्षे विविध विषयांवरील लेखन करीत आहे . अंगी असलेल्या लिखाणाचा गुण ,विषयाची दखल ,उत्स्फूर्तपणा ,सामाजिक संवेदनशीलता या सर्व गुणांमुळे ते मला शक्य होते विविध विषयांवरील लेखन केले अगदी वैद्यकीय शिक्षण ,त्याची परिस्थिती ,समाज प्रबोधन , टीकात्मक ,प्रोत्साहनपर वगैरे विषय आणि त्याहूनही अधिक विषय अगदी मार्मिक व वाचणाऱ्याला थेट भिडतील अशा भाषेत मांडले . साधारण 90 ते 95 टक्के वाचकांकडून फार सुंदर प्रतिसादा मिळाला त्यातल्या काहींनी तर वेळोवेळी माझ्या लेखांना प्रसिद्धी मिळण्याविषयी सल्लामसलत केली परंतु अगदी पाच ते दहा टक्के लेखांना प्रसिद्धी मिळाली किंबहुना लेखकांच्या लिखाणाला प्रसिद्धी मिळणे हा एक राजकीय डावपेचाचा भाग असल्याचे लक्षात आले ,लेखकाचे लेखन कितीही मार्मिक ,सुंदर असो वाचकांशिवाय त्याला तसा अर्थ उरत नाही असे समाजप्रबोधनासाठी लिखाण करणाऱ्या माझ्यासारख्या लेखकाला वाटते ...