बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....
बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान..... मित्रांनो , कृत्रिम दंत रोपण ही प्रक्रिया तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकली असेल. कृत्रिम दंतारोपण म्हणजे, एकही दात नसलेल्या किंवा दात नसलेल्या रुग्णांच्या जबड्यामध्ये कृत्रिम रित्या पुन्हा दात बसवणे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याची कल्पना असेल .या कृत्रिम दंतरोपण प्रक्रियेमध्ये, साधारणता ज्या पद्धतीने एखाद्या भिंतीमध्ये आपण स्क्रू लावत असतो, त्याच पद्धतीने जबड्याच्या हाडांमध्ये हा स्क्रू लावला जातो आणि त्या स्क्रूच्या ज्या थ्रेड किंवा त्या स्क्रूच्या अटी असतात त्यामध्ये हाड हळूहळू वाढायला सुरुवात होते ,याला आम्ही म्हणतो इंटिग्रेशन म्हणजे थोडक्यात काय जबड्याच्या हाडांमध्ये टाकलेल्या कृत्रिम स्कूल ला हाडाने आपलेसे करून घट्ट करणे ही ती प्रक्रिया असते, साधारणता दोन ते तीन महिन्याचा कालावधी या प्रक्रियेसाठी लागतो. जबड्याच्या हाडांमध्ये टाकलेल्या स्क्रू हा घट्ट झाला आहे याची खात्री पटली, की आपण त्याच्यावरती दात बसवितो....