भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध डाॅ अमित नेमाणे
भारत आणि आंतरराष्ट्रीय संबंध डाॅ अमित नेमाणे वाचकहो नमस्कार ! उत्तरोत्तर माझ्या लिखाणाला मिळणारा प्रचंड वाढता प्रतिसाद पाहून लिखाणाची हुरूप वाढत जाते . मध्यंतरी भारत-चीन संबंध व दुसऱ्या महायुद्धा संदर्भात लिहिलेल्या लेखाला अनेकांनी सुंदर प्रतिसाद दिला . देश आणि देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध हा अगदी रोचक विषय आहे , असे वाचकांनी कळविले म्हणून भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयी आपण येथे चर्चा करू (अर्थात चर्चा म्हणजे माझ्या लेखाला तुम्ही दिलेला प्रतिसाद अपेक्षित आहे ) मित्रांनो सध्या आपले चीनशी सीमेवरील संबंध हे तणावाचे आहेत ,हे आपण सर्वजण रोजच पाहत ,वाचत असाल .लडाख या आपल्या केंद्रशासित प्रदेशाच्या पेंगोंग सु लेक या सीमावर्ती भागात आपला चीनशी वाद सुरू आहे . त्याचा पूर्व इतिहास बघितला तर काहीशे वर्षांपूर्वी लडाख हा भाग तिबेटमध्ये समाविष्ट होता . लडाख मधील लोकांची राहणी ,बोलणे ,खाने-पिने हे तिबेटीयन सारखेच आहे , परंतु इंग्रज राजवटीच्या कालावधीत जम्मू काश्मीर लडाख चा राजा आणि इंग्रजांन म...