दातांमध्ये फट पडत आहे का ? मग जरूर वाचा दंतरोग तज्ञ आणि वक्ते डॉ अमित नेमाणे यांचा लेख !
दातांमध्ये फट पडत आहे का ? मग जरूर वाचा दंतरोग तज्ञ आणि वक्ते डॉ अमित नेमाणे यांचा लेख ! नमस्कार मित्रांनो ! आपण आजवर अनेक विषयांवर चर्चा केली आहे , दातांच्या समस्यांपासून ते आरोग्याच्या अनेक समस्यांवर माझे अनेक लेख देखील प्रसिद्ध झाले आहेत .नुकतेच आंतरराष्ट्रीय कॅन्सर दिनानिमित्त घेतलेल्या कर्करोग तपासणी शिबिराला आपण अगदी भरभरून प्रतिसाद दिला , त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार ! आजच्या विषयाकडे वळूयात...... अनेक पेशंट , दंतरोग तज्ञांना विचारणार्या प्रश्नांपैकी एक अतिसामान्य प्रश्न म्हणजे , " डॉक्टर साहेब , दातांमध्ये अनेक फटी पडत आहेत ! काय करावे बरं ? " सर्वप्रथम आपण दातांमध्ये फट पडण्याची कारणे बघूयात . काही कारणे नैसर्गिक असतात , म्हणजे नैसर्गिक दातांमध्ये फटी ( गॅप ) असणे याला स्पेसिंग असे म्हणतात. अशा केसेसमध्ये दातांना तारा लावणे / ब्रेसेस लावुन फटी बंद करता येतात . मुळात हा आजार नव्हे ! साधारण वर्षभराचा कालावधी लागू शकतो . हाडांची आणि दातांची अपरिपक्वता किंवा काही जणुकीय आजार ही देखील काही कारणे आहेत . आता पाहूयात पॅथॉल...