डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे
समाजामध्ये डॉक्टरांची संख्या जरी वाढली असली तरी आपणास योग्य डॉक्टर निवडण्याचे जनतेसमोर नवे आव्हान उभे आहे!! नमस्कार मित्रांनो मी गेले अनेक वर्ष वैद्यकीय क्षेत्रात प्रॅक्टिस करीत आहे . अनेक रुग्ण येतात वेगवेगळे बरे-वाईट अनुभव सांगतात ,आश्चर्यकारक किंवा तेवढेच चित्तथरारक रुग्णांचे अनुभव देखील ऐकावयास मिळतात .डॉक्टर मंडळी देखील एकत्र बसली की डॉक्टरांकडून अनेक अनुभव ऐकावयास मिळतात किंवा OPD मध्ये पेशंट वर देखील असे अनेक प्रसंग ओढावतात. मध्यंतरी डॉक्टरांवर होणाऱ्या काही हल्ले चिंताजनक आणि निशंक निषेधार्ह होतेच याबाबत तिळमात्र शंका नाही, मात्र रुग्णांच्या काही व्यथा देखील लक्षणीय आहेत . डॉक्टरांनी योग्य वेळी योग्य सल्ला न दिल्याने प्राण गमावलेले किंवा विकलांग झालेले रुग्ण देखील समाजामध्ये दिसतात, डॉक्टरांना देव मानणारा हा समाज बऱ्याचदा डॉक्टरांच्या चुकीमुळे डोळ्यातून पाणी गाळताना देखील दिसत असतो, अशा वेळी डॉक्टरांचा कोप वगैरे झाला का? असे म्हणावे का ? असा प्रश्न पडतो .परंतु रुग्ण मित्रांनो आपल्या वरती काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर योग्य डॉक्टर निवडणे फार गर...