मानवी जीवन आणि प्रेशर कुकर.........
मानवी जीवन आणि प्रेशर कुकर...... डाॅ अमित वामन नेमाणे नमस्कार वाचक मित्रांनो ! आज आपण एक विशिष्ट विषयावर बोलूयात , साधारणत: ‘ अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर ‘ हे सावरकरांचे लिखाण वाचत असताना "प्रेशरकुकर " ही संकल्पना मला सुचली आणि त्याचे माणसाच्या आयुष्याची असलेले तांत्रिक नाते देखील स्पष्ट होऊ लागले . रजनीश नावाच्या अोशो आश्रम चालविणाऱ्या एका तत्त्ववेत्त्याने देखील अशाच प्रकारच्या जगण्याच्या पद्धती मध्ये "प्रेशर कुकर " संकल्पनेला महत्त्व दिल्याचेही दिसून येते. आयुष्य जगताना माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येतात , हे सांगण्यासाठी तुम्हाला फार मोठा तत्ववेत्ता असण्याची गरज नक्कीच नाही , मात्र तुम्ही बघितले असेल एखादा प्रचंड शांत स्वभावाचा व्यक्ती किंवा अगदी मितभाषी असणारा व्यक्ती असतो चिडतो तेव्हा प्रचंड गरजळ अोकतो , त्याच्या मनातली भडास काढतो . आपण नियमित अशा व्यक्तींना असे म्हणतो की , हा शांत स्वभावाचा माणूस चिडला की फारच चिडतो वैगेरे ... त्या विपरीत एखाद्या बडबड्या व्यक्ती हा विशेष त्र्यागा करीत नाही . थ...