दंतरोग तज्ञांना कोरोना चा वाढता धोका ; डॉ. अमित नेमाणे यांनी केली चिंता व्यक्त !
दंतरोग तज्ञांना कोरोना चा वाढता धोका ; डॉ. अमित नेमाणे यांनी केली चिंता व्यक्त !
६ महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरोना विषाणूने व्यापला असून, कोरोना संपल्यानंतर हे काम करू ! , कोरोना संपल्यानंतर ते काम करू ! अशा कोरोना विषाणू ची संसर्ग संपण्याच्या आशेने अनेक लोक किंबहुना संपूर्ण जग तग धरून आहे . रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे , दररोज रोज कोविड संदर्भात नवीन उपचार किंवा माहिती सोशल मीडियावरती फिरत आहे .ऍलोपॅथी ,आयुर्वेद ,होमिओपॅथी ,आजीबाईचा बटवा काही काही उरले नाही ...! अगदी प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा उपचार शोधला आहे , कोरोनाची लस आज येईल ! उद्या येईल ! या आशेवरती टीव्हीवरील बातम्यांनी मोठा आशावाद तयार केला आहे . लोक डाऊन या संज्ञे कडून अनलॉक या संज्ञे कडील प्रवास सध्या चालू आहे .मात्र अद्याप कोवीड थांबण्याची काही लक्षणे नाहीत . प्रत्येक तासाला रस्त्यांवर, शहरांतून ऍम्ब्युलन्स कर्णकर्कश्श आवाज करताना कानी पडत आहे . प्रत्येक आवाज जणू काही " काळजी घे ! " हेच सांगतो आहे .लोकांच्या चर्चांमध्ये कोविड , टीव्हीमध्ये कोविड , व्हाट्सअप ,सोशल मीडिया वरती कोविड , दवाखान्यांमध्ये कोविड , अशा सर्व परिस्थितीत सर्वाधिक कोरोनाचा धोका असलेल्या क्षेत्रापैकी एक क्षेत्र म्हणजे दातांचा दवाखाना आणि दंतरोग तज्ञ.
मुळातच सोशल डिस्टंसिंग , तोंडाला मास्क आणि सार्वजनिक ठिकाणी वस्तूंना स्पर्श न करणे या आधारावर कोविड शी सामना आपण करीत आहोत . मात्र दंतरोग तज्ञ रूग्णाला मास्क काढायला लावतात , तोंडाच्या अगदी जवळ येऊन तोंडात निर्खुन बघतात आणि त्यात रूग्णांची ट्रीटमेंट असेल तर दात घासणे या प्रक्रियेनंतर ( ऐरोसोल )थुंकीचे कण रुग्णाच्या तोंडातून बाहेर निघतात ते दवाखान्याच्या प्रत्येक कोपऱ्यात अगदी काही मिनिटात पोहचतात .दवाखान्यातील प्रत्येक पृष्ठभागावर त्याचे अस्तित्व असते . त्यात पेशंट कोरोना वाहक असेल तर हा संसर्ग अनेकांना होऊ शकतो हे नक्की मग त्यातुन दंतरोग तज्ञ सुटेल कसा !!
काळजी म्हणून अनेक दंतरोग तज्ञ PPE KIT वापरतात , सॅनिटायझेशन प्रभावी करतात , तापमान , ऑक्सिजन सॅच्युरेशन वगैरे वगैरे... सर्व काही चेक करून रुग्णांना आत घेतात . परंतु कोरोनाचा अभ्यास करता एवढी काळजी पुरेशी नाही .कोरोनाचा रुग्ण हा विंडो पिरियड म्हणजे नुकताच कोरोना संसर्ग झालेला असेल तर पुढच्या दोन ते तीन दिवसांत तो काहीही लक्षणे दाखवत नाही .आता असे रुग्ण दंतरोग तज्ञांनी ओळखायचे कसे ?? त्यात लक्षणे विरहित कोरोनाचे रुग्ण भरपूर वावरत आहेत !! प्रत्येक रुग्णाला लक्षणे नसताना कोविड ची तपासणी करायला पाठविणे कितपत योग्य आहे ?? पुन्हा कोरोना चा संसर्ग झालेल्या ( covid reinfection ) रुग्ण देखील लक्षण विरहित असतात असे एका अभ्यासातून निष्पन्न झाले आहे . विषय केवळ दंतरोग तज्ञ चा नाही , संपूर्ण वैद्यकीय विश्वाला वरील गोष्टी लागू पडतात . मात्र दंतरोग तज्ञ हा लोकांच्या तोंडात त्याच्या लाळेत काम करणाऱ्या डॉक्टर असल्याने , त्याचा धोका हा कैक पटीने वाढतो .
अनेक दंतरोग तज्ज्ञांशी याविषयी चर्चा केल्यानंतर असे कळाले की प्रत्येकजण PPE KIT वापरतो , हवा शुद्ध करण्याचे मशीन देखील अनेक दंतरोग तज्ञांनी आपापल्या दवाखान्यांमध्ये बसवून घेतले आहेत . मात्र हे पुरेसे नाही हे त्यांचे देखील मत आहे . दाताचे काम करणे हे जिकिरीचे असते . अर्ध्या ते एक मिलीमीटर बाजूला जीभ , गाल , महत्त्वाच्या नसा , रक्तवाहिन्या असतात त्यामुळे उपचार करणार्र्या डॉक्टरला कमालीची एकाग्रता लागते . PPE KIT घातल्यानंतर ती एकाग्रता मिळत नाही . किट मधुन डोळ्यांना प्रचंड धुरकट दिसते त्यामुळे डॉक्टरांना ही संरक्षण सामग्री हाताळावी लागते , त्याचमुळे निर्जंतुकीकरण पाळणे अशक्यप्राय होते . त्यामुळे सेरेना बरोबरच्या लढाईत दंतरोग तज्ञ कमकुवत भासतात.
त्यात दुसरी बाब म्हणजे दाताचे दवाखाने बराच काळ बंद ठेवणे शक्य नाही . निष्णात अनुभवी दंतरोग तज्ञाकडे रुग्णांचा तगादा लागलेला असतो तर बऱ्याच तज्ञांकडे मनुष्यबळ पुरेसे नसते , असले तरी त्याची आर्थिक देवाण-घेवाण ही केवळ दवाखान्याच्या अर्थाजनावरती अवलंबून असते. सर्व सामान्य दंतरोग तज्ञ देखील दवाखान्यांमध्ये लाखोंची गुंतवणूक करतो .त्यात जर भाडेतत्त्वावर दवाखाना असेल तर ते देखील देणे भाग पडते . आणखी दुसरी बाब म्हणजे डेंटल टेक्निशिअन दात बनविणारे तंत्रज्ञ हे देखील त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दंतरोगतज्ञावरती अवलंबून असतात . त्यामुळे दंतरोग तज्ञ दवाखाना बंद राहिल्यास अनेक लोकांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो आणि केवळ ह्याच अशा कारणांमुळे दंतरोगतज्ञाची पावले पुन्हा त्याच्या काही काळ बंद असलेल्या दवाखान्याकडे वळतात....
आशा एक ना अनेक संकटात दंतरोग तज्ञ सापडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे . त्यामुळे कोरेनाचा फार मोठा फटका हा दंतरोग विभागाला आणि पर्यायाने वैद्यकीय क्षेत्राला बसतोय हे नक्की.
वरील अशा अनेक दंतरोग तज्ञांच्या अडचणींबाबत डॉ. अमित नेमाणे यांनी पिंपरी-चिंचवड खबर शी संवाद साधला असता अनेक गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या व संबंधित सरकारी विभागा कडे दंतरोग तज्ञ्यांसाठी काही मागण्या देखील केल्याचे स्पष्ट केले .
Comments
Post a Comment