कोरोना लाॅक डाउन ........डाॅ अमित नेमाणे

"कोरोना लाॅक डाऊन !  "...........
                                    डाॅ अमित नेमाणे

निसर्ग हा आपली जहागीर असून आपण त्याचा मनमुराद आनंद लुटू शकतो ,अगदी निसर्गाची हानी होईपर्यंत, अशा आविर्भावात वावरणाऱ्या पृथ्वीवासीयांना निसर्गाने अगदी चांगलाच धडा शिकवला तो करोना विषाणूच्या स्वरूपात. घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या जगाला घड्याळातील सेल काढून ठेवल्याप्रमाणे कैद केले ,ते ह्याच कोविड १९ आजाराने . आज जवळपास संपूर्ण जग "लोक डाऊन "ह्या संज्ञेचा खऱ्या अर्थाने उपरोधिक आनंद लुटत आहे .अशा या बंदच्या परिस्थितीत एका बंद घराच्या बंद खोलीत लिहिलेला हा लेख .लेखन करीत असताना एक कबुतर ,काही चिमण्यांचे थवे ,काही कावळे खिडकीमधून आत कोंडलेल्या माझ्याकडे डोकावून बघताना , ते मला हिनावत आहेत की काय असाच भास होतोय ! असो !!

साधारणत काही महिन्यापूर्वी चीन देशात या आजाराची सुरवात झाली असे म्हणतात . नेमकी तारीख किंवा महिना सांगता येत नाही कारण मुळातच साम्यवाद किंवा कम्युनिजम सारख्या संकल्पनातुंन एखाधिकार शाही सारखी परिस्थिती असलेल्या चीन देशा बद्दल काही भाकीत वर्तवणे किंवा अंदाज बांधणे अवघड वाटते . चीन सारख्या लहान डोळे असणाऱ्या नागरिकांनी ( अर्थात लहान डोळे असणाऱ्यांच्या भावनेला भडकविण्याचे किंवा त्याच्या अंगविक्षेपावर टीका करणे वैगरे हेतू माझा मुळीच नाही, तशी माझी प्राज्ञा ही नाही ) जगाला डोळे "वटरायला" लावले हे मात्र खरे. एेकिव बातम्यांवरून असे लक्षात आले की वरील विषाणू हा चीनच्या "वेट मार्केट" मधील आहे . अक्षरशहा कुठल्याही सजीव प्राण्यांना खाण्याची सोय आणि क्षमता असलेल्या चीन( सौजन्य युट्युब वरील वेट मार्केट चीन संबंधित व्हिडिओ ) मध्ये या विषाणूचा जन्म झाला . तो झाला असेल किंवा नसेल , परंतु प्राण्यांना निर्दयीपणे मारून त्यांचे अवयव खाणाऱ्या चिनी नागरिकांना बघून विक्षिप्त पणाची सीमा त्यांनी कधीच ओलांडली आहे असे जाणवते . मांसाहारआस माझा विरोध नाही परंतु अगदी झुरळ ,कुत्री ,माकडे , वटवाघळे वगैरे वगैरे खाणाऱ्या चिनी नागरिकांना , " माणूस खायला कधी सुरुवात करणार आहात ?? " हा प्रश्न विचारावासा वाटतो....
      अन्न साखळीवगैरे संकल्पना ह्या आपल्या जागेवर !! तरीही चीनची राक्षसी प्रवृत्ती फारच भयावह वाटते . धार्मिकतेच्या गाभाऱ्यातून विज्ञानाची सुरुवात होते हे माणसाने विसरून चालणार नाही . "जसा आपला आहार तसा आपला विहार "हे भारतीय संस्कृतीत फार पूर्वी सांगितले आहे विज्ञान आणि त्याला मान्यता देखील दिलेली आहे . पदोपद इतका विक्षिप्त मांसाहार करणाऱ्या चीनचा विचार ,व्यवहार कसा आहे हे संपूर्ण जगाने आज मीतिला बघितले आहे.
   जागतिक आर्थिक महासत्ता वगैरे ह्या गोष्टी ठीक आहेत .चिनी लोकांच्या कार्यक्षमतेबद्दल देखील त्यांचा आदर आहे ,परंतु आजच्या जगात पसरलेल्या कोरोनाच्या जागतिक महामारी ला कारणीभूत चीन आणि तेथील सरकार आहे यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही . देशांतर्गत चाललेल्या हालचाली देशाबाहेरील राष्ट्रांना जाणवू न देणे किंबहुना त्यांच्यावर पडदा घालने हीच जर चीन मधील " साम्यवादाची "व्याख्या असेल साम्यवादाचा खरा अर्थ चीन सारख्या राष्ट्राला कळला आहे की नाही ? अशी शंका उपस्थित होते ! आपण आर्थिक महासत्ता आहोत आणि जगातल्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांना WHO लागले आपण दडपशाही खाली ठेवू शकतो हा चीनचा आणखीन एक दुसरा गैरसमज . UNO ने साधारणता 1948 मध्ये डब्ल्यूएचओ ची (विश्व आरोग्य संघटनेची )स्थापना केली . WHO ने गेली अनेक वर्षे अगदी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे .गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या जागतिक अस्तित्वाबद्दल सर्वश्रुतता आहे परंतु अमेरिकेने विश्व आरोग्य संघटने वर दबाव आणल्याचे ऐकिवात नाही . अमेरिका फर्स्ट हे जरी अमेरिकेचे धोरण असले तरी अशाप्रकारे अमेरिकेने जगाचे नुकसान केल्याची कुठलीही बातमी नाही . प्लेग ,टीबी ,पोलिओ ,इबोला ,स्वाइन फ्लू अशा अनेक साथीच्या आजारांवर ती नियंत्रण मिळवण्यात विश्व आरोग्य संघटनेला यश आले आहे , त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे परंतु कोरोनाच्या महत्त्वाच्या पहिल्या टप्यात" माणसापासून माणसाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकत नाही " किंवा " लाॅक डाउन करणे किंवा आंतरराष्ट्रीय विमाने बंद करणे हा त्यावरचा पर्याय नाही "किंवा " चिनी लोकांना संशयाने बघू नका " अशा प्रकारचे WHO चे ट्विट वाचल्यावर आश्चर्य वाटते .कोरेना संदर्भात दोषारोप पत्र दाखल केल्यास चीन सरकार आणि विश्व आरोग्य संघटना हे त्यातील प्रमुख दोन आरोपी असतील हे नक्की किंबहुना अनेक जागतिक संघटनांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात अशा प्रकारचे दावे देखील दाखल केले आहेत.
चीन पासून सुरुवात झालेला कोरूना जगात थैमान घालतो आहे . माणूस ,धर्म ,देश , भौगोलिक सीमा यापैकी कशाचीही हया न बाळगणारा कोरोनाचा विषाणू रोज हजारो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे . इतर ग्रहांवर जाण्याचे स्वप्न असणाऱ्या पृथ्वीवासीयांना निसर्गाच्या कोर्टाने पृथ्वीवरचा सातबारा देखील कोरा करण्याचे आदेश दिल्यासारखे वाटते . माणूस आहे म्हणून समाज समाज आहे म्हणून अर्थव्यवस्था !! माणूसच उरला नाही तर अर्थव्यवस्थेचे काय !! मुळात भाजी भाकरी यापेक्षा माणसाच्या तशा काही गरजा नसतात हे आज प्रत्येक लाॅक डाऊन मध्ये असलेल्या नागरिकाला पटले असेलच . जगात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीतून पॉझिटिव काय घ्यायचे हे आपण ठरवायचे असते . आज घरबसल्या बरीच मंडळी स्वतःतल्या " मि " ची शोध घेत आहेत . छंद जोपासत आहेत , वाचन करीत आहेत , माहिती मिळवीत आहेत .ह्या  सगळ्या गोष्टी काही वाईट नाही . एखादे मशीन ओवरलोड झाले की शट डाऊन करायचे आणि मग परत चालू करायचे अशा प्रकारे जगाच्या बाबतीत घडले तर त्यात गैर काय आहे.
यासारखे बरेच आहे . प्रत्येकाने स्वतःतल्या
" मि " चा शोध घेऊन पुन्हा कोरोना संपुष्टात आल्यावर एका नव्या उमेदीने बाहेर पडावे . नवे विचार ,नव्या सुधारणा , जीवन जगण्याची एक बदललेली पॉझिटिव जीवन शैली !! मृत्यू पावलेल्या आत्म्यास शांती लाभो आणि जिवंत असणाऱ्या मानव जमाती पासून पृथ्वीला शांती लाभो हीच सदिच्छा !!

टिप:- लाॅक डाऊन मध्ये घरात अडकलेल्या प्रत्येकाने काहीतरी सकारात्मक गोष्ट करावी आणि तसे केले तर ह्या गमवण्याच्या परिस्थितीमध्ये आपण काहीतरी कमावल्याचा आत्मविश्वास आपणास प्राप्त होईल.
वरील लेख डॉ अमित नेमाणे यांचा असून , हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.....नावासह फॉरवर्ड करण्यास हरकत नसावी.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे