भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी !!

भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी ! 


                         डॉ अमित नेमाणे 


नमस्कार मित्रांनो ! एका नवीन विषयावरती बोलूयात , मध्यंतरी एक बातमी आली जी आपण सातत्याने वाचत आहोत , वृत्तपत्रांमध्ये देखील आपण ती वाचत असाल . जागतिक नकाशा मध्ये असलेल्या अनेक छोट्यामोठ्या देशांमध्ये सातत्याने वाद-विवाद चालूच असतात . दोन देश जर एकमेकांची सीमा लागून असेल , तर त्यांच्यामध्ये हमखास कुठल्या न कुठल्या विषयावरती विवाद असतोच . आता आपण ऐकले असेलच की इजरायल आणि पॅलेस्टाईन या दोशन या दोन देशांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद चालू आहे आणि त्याचे एका युद्धभूमी मध्ये रूपांतर झाले आहे . आजकाल युद्धे तुल्यबळ असून प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढण्याऐवजी ते जागतिक राजकीय पटलावर जास्त त्वेषाने लाढली जातात . आपण बऱ्याचदा हे पाहिले असेल की , जगामध्ये दोन देश ज्या वेळेस एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात ,त्याच वेळेस संपूर्ण जग देखील दोन विचार प्रवाह मध्ये विभागले जाते . सध्या असलेला विवाद म्हणजे इजरायल आणि पॅलेस्टाईन नावाच्या दोन देशांमधला आहे . इजराईल मध्ये येहुदी वंशाचे लोक राहतात , त्याचप्रमाणे पॅलेस्टाईनमध्ये मुस्लिम धर्मीय लोक राहतात आणि फिलिस्तीन हे दोन्ही देश ( मिडल इस्ट )आशिया खंडाच्या भागांमध्ये मोडली जातात आणि ह्याची देशाची सीमा भूमध्य समुद्राची जोडली जाते .

     जगामध्ये इंग्रजांनी बऱ्याचशा ठिकाणी आपलं राज्य प्रस्थापित केले होते , मात्र कालांतराने इंग्रजांना त्यात्या देशांचे राज्य सोडून प्रत्येक देशाला स्वातंत्र्य देणे भाग पडले.  ब्रिटिशांनी आपल्या देशांमध्ये परत जाताना , जिथे त्यांची राजवट होती त्या देशांमध्ये विविध प्रकारच्या राजकीय तडजोड करण्याचे काम केले आणि त्यातूनच अनेक देशांमधील वाद अस्तित्वात आले . त्यात नावाजलेला वाद म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांचा सीमा वाद ! 

  अशाच प्रकारे इजराइल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांमध्ये देखील सीमावादाचे श्रेय हे दुर्दैवाने ब्रिटिश राजवटीला जाते .आपले या दोन्ही देशांशी असलेल्या संबंधांबद्दल बोलायचे झाल्यास , भारताचे इजराइल शी असलेले संबंध हे प्रचंड दृढ असून ,संपूर्ण जगाला भारत आणि इजराईल यांच्या मैत्री बद्दल माहिती आहे . इजराईलने ने भारताला अनेक वेळेस मदत केलेली आहे ,मग ती मदत वेगवेगळ्या स्वरूपाची असेल ,युद्धसामग्री देणे असेल किंवा तंत्रज्ञान देने असेल .अशाच अनेक प्रकारची मदत भारत इस्राईलला देखील गेल्या अनेक वर्षापासून करत आहे .त्याचप्रमाणे भारत देखील इस्राईलची चांगलेच व्यापारी संबंध टिकवून आहे .जगामध्ये अतिशय कडवट प्रतिकार करणारा आणि प्रचंड कष्टाळू ,सामर्थ्यवान देश म्हणून इस्राईलचे नाव घेण्यास काहीच हरकत नाही .मुळात इजराइल हा देश प्रचंड छोटा आहे . ह्या देशाने केलेली प्रगती आणि त्या देशात तंत्रज्ञान हे जगाला भरून टाकेल इतके मोठे आहे .इजराइल हा देश जवळपास 80 टक्के स्वावलंबी आहे . रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी ह्या इजराइल मध्येच बनल्या जातात . त्यांची इतर देशांवर अवलंबित्व हे फार जास्त नाही .ही त्यांची जमेची बाजू आहे .जगातील सर्वश्रेष्ठ पाच संरक्षण बलाढ्य देशात इजराइल हे नक्कीच जगाला आपले अस्तित्व दाखवून आहे . आजतागायत इजराईल ने अनेक आखाती देशांशी युद्ध केली आहेत , मात्र इजराइल ही सगळी युद्धे एक हाती जिंकली आहेत . शत्रूला लक्षात ठेवून ,शत्रूच्या घरात घुसून मारणार आज जगातील एकमेव देश म्हणजे इजराइल ! (अमेरिके व्यतिरीक्त ) . जगातील सर्वश्रेष्ठ खूफीया एजन्सी हीदेखील आज मोसाद या नावाने जगामध्ये ओळखले जाते ती ही इजराईली आहे.

     ज्यावेळेस ब्रिटिशांनी पॅलेस्टाईन हा छोटासा देश सोडून , आपल्या तेथील राजवट बंद केली तेव्हा त्यांनी हा देश सोडून जाताना या देशांमध्ये अल्पसंख्याक असलेल्या यहुदी समाजाला देखील देशाचा काही भाग भेट म्हणून दिला आणि इजराइल या देशाची निर्मिती झाली ती 1948 ला ! आज येहुदी समाजाचा जगातील एकमेव देश म्हणजे इजराईल ! 1948 मध्ये संपूर्ण फिलिस्तीन या देशांमध्ये केवळ 12 टक्के भूभाग हा इजराइल या वेगळ्या देशाला , ब्रिटिशांनी दिला होता . प्रत्येक वेळेस अनेक छोट्या ,मोठ्या लढाया करून इजराइल ने आपला विस्तार केला आणि आज हा देश जवळपास 80 ते 85 टक्के फिलिस्तीन या देशावर्ती काबू करून बसला आहे . आजही इजरायल स्वतःला वाढणाऱ्या सीमांचा देश म्हणून संबोधतो.

    आता आपण पाहूयात पॅलेस्टाईन ( फिलिस्तीन ) या देशाविषयी थोडीशी माहिती . मूळ फिलिस्तीन हा दे सध्याच्या घडीला फार लहान देखील आला आहे मात्र त्याचा भूतकाळ हा इतका लहान विभागाच्या स्वरूपात नव्हता संपूर्ण इजराइल मध्ये दोन भागांमध्ये फिलिस्तीन देशाचे अस्तित्व सध्या टिकून आहे , एक म्हणजे वेस्टन बँक आणि दुसरे म्हणजे गाझा पट्टी ! उरलेल्या ह्या भूभागावर तीदेखील इजरायल काही वर्षांतच हल्ला करून पॅलेस्टाईन देशाचे संपूर्ण अस्तित्व संपवण्याच्या बेतात आहे . पॅलेस्टाईन हा बहुसंख्य मुस्लिम समाजाचा देश असल्याकारणाने , इस्लामिक ऑर्गनायझेशन कंट्री असलेले  मुस्लिम देश सातत्याने पॅलेस्टाईन ली पाठिंबा देतात आणि इजराइल चा निषेध करत असतात . पॅलेस्टाईन आणि काही आखाती देशांनी एकत्र येऊन , पॅलेस्टाईन साठी , इजराईल च्यायला विरोधात यु एन ओ मध्ये धाव घेतली . यु एन ओ नी पॅलेस्टाईन आणि इजराइल या दोन्ही देशांना मान्यता दिली . वादाचा मुद्दा ठरला तो म्हणजे जेरुसलेम नावाचा एक भाग ! हा भूभाग हा इजराइल मधील फिलिस्तीन या देशाच्या आत मध्ये असलेला एक भूभाग आहे . येरुसलेम चे वैशिष्ट्य म्हणजे येथे तीन धर्माचे श्रद्धास्थान आहे . ख्रिस्ती धर्म , यहुदी धर्म आणि मुस्लिम धर्म या तिघांचेही श्रद्धास्थान या भागांमध्ये असल्याकारणाने , जेरूसलेम हा स्वतंत्र देश प्रस्थापित केला , आणि या वरती फिलिस्तीन किंवा इजराईल चार अधिकार नसेल . परंतु स्वतंत्र देश यू एन ओ त्या अधिपत्याखाली असेल , असे यु एन ओ नी स्पष्ट केले . या सगळ्यांचा पूर्वइतिहास पहाता ,  सर्वात जास्त अन्याय झालेला देश असेल तर तो फिलिस्तीन ( पॅलेस्टाईन) !!  पॅलेस्टाईन ली आखाती देशांचा प्रचंड पाठिंबा असला , तरीदेखील इजराइल सारख्या देशाला अमेरिका ,फ्रान्स ,जर्मनी यांसारख्या देशांचे प्रचंड मोठे पाठबळ आहे . ( जर्मनी चा पुर्व इतिहास हा यहुदी विरोधात होता मात्र आता परिस्थिती बदलली आहे ) . इजरायलच्या दबावाखाली फिलिस्तीन या देशाने आपले कुठलेही सैन्यदल , आपले कुठलेही इतर संरक्षण दल उभारले नाही . या देशाला स्वतःची सरकारी संरक्षण यंत्रणा नाही . याच कारणामुळे हामास नावाची एक आतंकवादी संघटना पॅलेस्टाईन मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे . आज हीच आतंकवादी संघटना सातत्याने इजराइल च्या विरोधात युद्ध पुकारत असते , मात्र ईजराईल सारखा बलाढ्य देश अशा युद्धाला भीक न घालता हमास चे आणि पर्यायाने फिलिस्तीन या देशाचे लचके तोडत आहे , अशाच पद्धतीने सर्व गोष्टी जागतिक पटलावर चालूच राहिल्या , तर काही वर्षांमध्ये फिलिस्तीन या देशाचे अस्तित्व जगाच्या नकाशावरून मिटवण्याचा धोका संभवतो . आजच्या घडीला संपूर्ण जग हे पुन्हा ईजराइल आणि फिलिस्तीन या दोन देशांमध्ये विभागले आहे . फिलिस्तीन साठी देशाची लढाई आहे ती त्यांच्या पूर्व भागातील भूभागावर विरुद्ध इजराइल चे असे म्हणणे आहे की , त्यांची ही अस्तित्वाची लढाई आहे . येहुदी समाज जर आपला इजराइल देश राखू शकत नसेल तर इजराइल वगळता येहुदि समाजाला , जगाच्या पाठीवरती कुठलाही देश नाही . काही प्रमाणात इजराईल चा मुद्दा देखील या ठिकाणी योग्य असा वाटतो.

      युनायटेड नेशन मध्ये भारतीय हाय कमिशन ने दिलेल्या भाषणा नुसार , सध्याच्या इजराइल आणि पॅलेस्टाईन या विवादामध्ये भारत , पॅलेस्टाईन च्या बाजूने आहे . याने जगातील अनेक देशांना आश्‍चर्याचा धक्का बसला . जगातील सर्वात जिवलग असणारा आपला मित्र इजराईल सोडून , भारताने फिलिस्तीन ला दिलेला पाठिंबा हे एक राजकीय कूटनीति चे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे . जागतिक राजकारणामध्ये कुठलाही देश हा इतर देशाचा मित्र किंवा शत्रू हे तात्काळ स्वरूपाचे असतात आणि ही समीकरणे सातत्याने बदलत असतात . पॅलेस्टाईन देशाला पाठिंबा देण्यामागे भारताने केलेली आपली भूमिका अतिशय स्पष्ट आहे , येथे भारताचे म्हणणे असे आहे की , पॅलेस्टाईन देशाचा स्वतःच्या काही भूभाग इजराइल या देशाने युद्धामध्ये बळकावून घेतलेला आहे , अनैसर्गिक काबीज केलेला पॅलेस्टाईन चार भूभाग हा इजराईल नी परत द्यावा !! ही भारताची मागणी आहे याचाच अर्थ , " जगातील कुठलाही देश इतर देशाचा बळकावलेला भूभाग आपल्याकडे ठेवू शकत नाही " हा युक्तिवाद भारताने युनायटेड नेशन मध्ये केला . अप्रत्यक्षरीत्या भारताचा बळकावून घेतलेला काही भूभाग जो पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि चीनने बळकावलेला अक्साई चीन हा चीन ने भारतास पुन्हा परत करावा , त्याचाच संदर्भ भारताच्या युनायटेड नेशन मधील भाषणावरून जाणवतो. 

     मित्र असो किंवा शत्रू जगाच्या राजकारणामध्ये भारत देशाला आपले विचार अगदी स्पष्टपणे मांडायचे आहेत , ते करताना इजराइल सारख्या सख्या मित्रांना दुखावने ही भारताला परवडणारे नाही . त्यातच फिलिस्तीन सारख्या देशाला पाठिंबा दिल्यामुळे सत्तावन्न देशांचा इस्लामिक ऑर्गनायझेशन भारतीयांच्या पाठीशी उभी राहील आणि आपला शेजारील असलेला पाकिस्तान याला इस्लामीक ऑर्गनायझेशन बिलकुल भारता विरोधात पाठिंबा देणार नाही , ही देखील त्या मागील कूटनैतिक रणनीती असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत आहे .फिलिस्तीन ला पाठिंबा देऊन भारताने मास्टरस्ट्रोक मारल्यासारखे जाणवते . इजराईल शी व्यापार हा केवळ एकच देशा शी निगडीत आहे मात्र इस्लामिक ऑर्गनायझेशन कंट्रीज मध्ये 57 देश आहेत , ज्यांच्याशी भारताचा व्यापार 18 टक्के होऊन देखील अधिक आहे .

     आता भारताला भविष्यामध्ये युनायटेड नेशन चे पुर्णकाळ सार्वभौमिक सभासदत्व हवे आहे . त्यामुळे 193 देशांपैकी किमान 130 देशांनी , भारताला युनायटेड नेशन मध्ये पाठिंबा देणे गरजेचे आहे आणि इस्लामिक ऑर्गनायझेशन कंट्रीज मध्ये साधारण सत्तावन्न देशांचा समावेश आहे . केवळ एका इजराइल साठी आपण 57 देशाची नाराजी पत्करू शकत नाही कारण आपले लक्ष मोठी आहेत .

     वरील भारताच्या निर्णयावर इजरायल ने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही , अाता , इजराइल काय प्रतिक्रिया देतो हे बघणे औत्सुक्याचे ठरेल . जागतिक पातळीवरती भारताने पुन्हा एकदा आपला सिद्धांतवाद श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले आहे . इजराइल च्या विरोधामुळे आपणाला अमेरिकेशी फ्रान्स आणि जर्मनी शी देखील विरोध पत्करावा लागणार असल्याचे चित्र तयार होऊ शकते , येथे आपला संदर्भ हा मूळ सिद्धांत वादा शी आहे , हे समजावण्यात जर आपण यशस्वी झालो तर , विरोध करून देखील आपण आपले इस्रायल ,अमेरिका ,फ्रान्स ,जर्मनी सारखे मित्र टिकवून ठेवून , आखाती देशांशी असलेल्या मैत्री देखील द्रढ करू शकतो . हेच वरील निर्णयाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

            लेखक  

   डॉ अमित वामन नेमाणे 

(लेखक आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांचे अभ्यासक आहेत)

Comments

Post a Comment