अर्थकारण स्त्रीदाक्षिण्याचे........... डाॅ अमित नेमाणे
अर्थकारण स्त्रीदाक्षिण्याचे...........
डाॅ अमित नेमाणे
कोरोना विषाणू मुळे जगाची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे , या जागतिक महामारी चे अनेक खोलवर परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे हे सांगण्यासाठी कोणी अर्थ पंडिताची गरज नाही . जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्थेला लोअर मिडल क्लास मध्ये वर्गीकरण केल्याचा रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला , मुळात अपर क्लास , अप्पर मिडल लोअर मिडल आणि लोअर क्लास असे काहीसे वर्गीकरणाचे स्वरूप विश्व बँक मांडते त्यात भारतीय अर्थव्यवस्था ही शेवटून दुसरी म्हणजे लोअर middle-class असल्याचेही स्पष्ट करते .वरील विश्व बँकेचे वर्गीकरण हे साधारणतः दरडोई उत्पन्न याला अनुसरून आहे ,म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रत्येक व्यक्ती व पर्यायाने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न यामध्ये मोजले जाते . उपरोक्त मापदंडानुसार भारतीय लोक फारच सुमार समजली जाणारी कमाई करतात.....
वरील माहिती वाचल्यानंतर काही आणखी अर्थकारणासंबंधित शोधनिबंध वाचले , त्यातून काही तथ्य समोर आली ती आपणासमोर मांडावीशी वाटली म्हणून तात्काळ लेख बद्ध विचारांचा पर्याय आत्मसात केला.
सर्वात प्रगत समजले जाणारे युरोप व अमेरिका खंडात काम करणाऱ्यांमध्ये स्त्रियांची संख्या ही पंचेचाळीस टक्के एवढी आहे आणि भारतात ही केवळ 11 टक्के , याचा अर्थ काम करणार्या 100 लोकांपैकी केवळ १८ स्त्रिया ह्या घराबाहेरील काम करून अर्थार्जन करतात . याच वेळी युरोपात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण हे अगदी एकास एक गुणोत्तरात आहे , त्याचबरोबर आर्थिक मागास समजल्या जाणाऱ्या आफ्रिका खंडात केवळ साडेसात टक्के स्त्रिया ह्या प्रोफेशनल वर्किंग वुमन आहेत . वरील साऱ्या मसुद्याचा सारांश काढायचा झाला तर स्त्रियांचे देशाच्या आर्थिक प्रगती मधील योगदानाचे महत्त्व अगदी स्पष्टपणे अधोरेखित होते.
आता भारतीय स्त्रियांची आपल्या देशाच्या एकूण आर्थिक जडणघडणीतील वाटा बघू ! मुळात पुरुषप्रधान संस्कृती म्हणून आपली सुरुवात आहे असे म्हणायला हरकत नाही , मागील काही वर्षांपासून स्त्री ही केवळ चूल , मूल या मध्येच अडकून पडलेली जाणवते . घर सांभाळणे हे जरी मोठे आणि जिकिरीचे काम असले तरी प्रोफेशनल वुमन ची आर्थिक बेरीज वजाबाकीच उपरोक्त संस्थांच्या रिपोर्टमध्ये गणली जाते हे सत्य आहे . स्वातंत्रोत्तर काळात स्त्री शिक्षणाचा जागर घरो घरी पोहोचायला सुरुवात झाली , " मुलगी शिकली , प्रगती झाली " याची जाणीव भारतीय समाजाला होऊ लागली , तसतशी समाजाच्या आर्थिक घडामोडी सुधारू लागल्या . दरडोई उत्पन्नाची वाढ ,चांगले राहणीमान, स्वच्छता ,संस्कार, संस्कृती वधारू लागले . ज्या कुटुंबात स्त्री शिकली तिथे प्रगतीच्या वाटा स्पष्ट खुणावू लागल्या , परंतु मागील काही वर्षांमध्ये स्त्री शिक्षणाचा प्रवास हा अर्थार्जनात होण्यात अडथळे येऊ लागले .मुलींचे लग्न झाले की तिथे व्यावसायिक काम , नोकरी गमवावी लागत असे किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे तिला शिक्षणाचे नोकरीत रूपांतर करणे अवघड जाऊ लागले . स्त्री जीवनाचा प्रवास प्रचंड खडतर असतो यात दुमत असण्याचे कारण नाही . " मुलगी शिकली तर दोन कुटुंब सुधारतात " ही मन अगदी तंतोतंत खरी आहे परंतु सध्याचे चित्र थोडे विचलित करणारी आहे . शिक्षणामध्ये गेले अनेक वर्षापासून प्रगती झाली अगदी शेवटच्या मुली पर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावे असे अनेक कायदे, सरकारी सोयी सुविधा तयार झाल्या , अनेक मुलीने त्याचा लाभ देखील घेतला परंतु त्या शिक्षणाचा नोकरीत किंवा व्यवसायात रूपांतर होण्याचा दर हा अगदीच कमी आहे . शिक्षकी पेशा किंवा अभियांत्रिकी ,वैद्यकीय पेशा सोडला तर इतर माध्यमांत स्त्रियांची संख्या बरीच कमी दिसते , कामाच्या ठिकाणी स्त्रीला मिळणारी वागणूक आणि तिची होणारी पिळवणूक ही सर्वश्रुतच आहे , हा देखील चिंतेचा विषय आहे . समाजात व कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा पिळवणूकींमुळे देखील काही स्त्रिया घरीच राहण्याचे पसंत करतात . अशा होणाऱ्या अडचणींवर देखील मात करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था व सरकारी धोरणे अवलंबली जातात .
स्त्रियांचा आर्थिक सहभाग वाढविण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्नशील आहे .अगदी महिला आरक्षण पासून ते प्राधान्यक्रमा पर्यंत सरकारी प्रयत्न देखील भरपूर झालेत परंतु अजूनही काम करणाऱ्या व आर्थिक उदरनिर्वाह मध्ये आपला वाटा उचलणाऱ्या स्त्रियांची संख्या भारतात तरी बरीच कमी असल्याचे दिसते.
दरडोई किंवा कौटुंबिक उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले , तर जिथे स्त्री-पुरुष दोघेही कमावते आहेत त्या कुटुंबाचा आर्थिक , सामाजिक , संस्कृती , राहणीमान आणि पोषणाचा दर्जा उच्च असल्याचे जाणवते . जेथे एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री कमावते त्या कुटुंबामध्ये प्रगतीला थोडे अडथळे आल्याचे देखील जाणवते. स्त्रियांनी शिक्षणाचा वापर करायची वेळ आलेली आहे ,पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर पुरुषांच्या पुढे एक पाऊल जाण्याची वेळ आली आहे . महिला कामासाठी घराबाहेर पडली तर घरची जबाबदारी कोण सांभाळणार ? असा प्रश्न आपल्याला पडत असेल तर आपण नक्कीच पुरुष आहात !! , असे म्हणायला हरकत नाही .मुळात जन्म घेतल्यावर अमुक व्यक्तीने हेच काम करावे किंवा स्त्रियांनीच घरकाम करावे असे कुठेही नमूद नाही . पुरुष देखील घरची , मुलांची जबाबदारी घेऊ शकतात हे समजण्याची ही वेळ योग्य समजावी .
इतिहासात देखील अगदी झाशीची राणी लक्ष्मीबाई ,अहिल्याबाई होळकर ,सावित्रीबाई फुले ,आनंदीबाई जोशी यां पासून ते किरण बेदी ,कल्पना चावला ते आजच्या अरुंधती रॉय ,मेरी कोम, हेमा दास ते अगदी कालपर्यंत प्रथम भारतीय लढाऊ विमान वैमानिक झालेल्या मोहनसिंग ,अवनी चतुर्वेदी ,भावना कांत ह्या स्त्रियांनी देखील स्वप्न बघून ते सिद्ध आणि प्रत्यक्षात उतरवण्याची स्पर्धा अर्धवट सोडली नाही याचे विशेष कौतुक वाटते . इतक्या मेहनतीने व कष्टाने घेतलेल्या शिक्षणाचा प्रत्यक्षात वापर न करणे हे कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येक शिकलेल्या स्त्रीने केला पाहिजे .केवळ निसर्गाने दिलेल्या ओळखीन वर विसंबून न राहता स्त्रीने देखील स्वतःची एक ओळख तयार केली पाहिजेल , मग ते नोकरी व्यवसाय किंवा समाज सेवा किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून असेल . उच्च शिक्षण घेतलेल्या आणि त्याचे नोकरी व्यवसायात रूपांतर न केलेल्या प्रत्येक स्त्रीने याचा विचार करायला हरकत नाही . आपणही तेच पुस्तक वाचले आहे ,त्याच बाकावर आपणही बसलो आहोत , आपलाही पहिल्या पाचात नंबर आलेला आहे , आपल्यालाही गुणगौरव आणि शिक्षकांच्या कौतुकाने आनंदित केलेले आहे , मग आज आपण त्या शिक्षणाचा वापर का करीत नाही ?? हे स्त्रियांनी ओळखायची योग्य वेळ हीच आहे . स्वतःतील स्वत्व जागे करून आपली ओळख केवळ कुटुंब ,परिवारापुर्ती न ठेवता ती समाजातील काम करणारी रणरागिनी म्हणून झाली पाहिजे .भारतीय संस्कृतीत आपण स्त्रियांना देवीचा दर्जा देतो अशी स्त्री दाक्षिण्य भारतीय संस्कृतीचा केवळ अभिमान न बाळगता ,ह्या स्त्रीदाक्षिण्याचे अर्थकारणातील स्थान व त्याचे महत्त्व पटवून देण्याची हीच ती वेळ .
वरील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार असून समाजातील स्त्रियांचे स्थान उंचाविणे , केवळ ह्या शुद्ध हेतूने वरील लेख लिहिला आहे .
डॉ. अमित वा नेमाणे.

Khup chan vichar ahet tuze Amit parantu shokantika aaj cha striyanchi hi ahe ki ase vichar karnare ticha gharat kitti purush ahet? Tyamule arthkarnasathi fact tine pudhakar gheun upayog nahi tar tila tashi sath milane hi mahatvache ahe karan tyamadhe tarevarchi kasarat tichich hote mhanun kittek striya talent asun suddha mage ahet, tu ji vichar dhara mandalis kharach khup kautukaspad ahe, asha ahe ti pratek purushat yavi tevhach motha badal hoil anyatha percentage kamich rahtil
ReplyDelete