#wakeupparents#
#wakeupparents#
# पालकांनो जागे व्हा#
- डाॅ अमित नेमाणे.
नमस्कार मित्रांनो ! कसं चाललय लाॅक डाऊन? बरेच दिवस झाल्याने आता आपल्याला बऱ्यापैकी घरी राहण्याची सवय झाली असेल किंबहुना आपल्या पैकी बऱ्याच लोकांनी आपली स्वतःची दिनचर्या देखील ठरविली असेल . असो ! आजवर मी अनेक लेख लिहिले आणि प्रसिद्ध देखील केले . सर्वांच्या प्रतिक्रिया त्यावर मला नियमित मिळत असतात , आपणा सर्वांचे आभार !! आजचा विषय अगदीच पोटतिडकीने मांडावासा असा आहे.....
काही वेळापूर्वी बातम्या वाचत असताना , अचानक एक अतिशय हीन दर्जाची बातमी वाचली आणि एक पालक म्हणून माझे मन अगदी खिन्न झाले . दिल्लीमध्ये काही मुलांनी इंस्टाग्राम नावाच्या सोशल मीडिया वरती बॉइज लॉकर रूम नावाचा एक चॅट ग्रुप बनविला आणि त्या ग्रुप वर अनेक मुलीं विषयी , महिलांविषयी अतिशय अश्लाघ्य शब्दांमध्ये ते नियमित चर्चा करत असल्याचे उघड झाले , आश्चर्य तर तेव्हा वाटले जेव्हा हे कळाले की ती सर्व मुले अठरा वर्ष वयापेक्षा लहान म्हणजेच नाबालिक आहेत . ह्या मुलांचे संवाद केवळ ह्या अश्लाघ्य शेरेबाजी वरती न थांबता विविध मुलींचे फोटो क्रोप करणे , त्यां विषयी नियोजन करणे , कमेंट करणे ,रेप विषयी प्लॅनिंग करणे वगैरे पर्यंत मुलांची मजल गेली . धाडसाने एका मुलीने वरील सर्व स्क्रीन शाेर्ट व्हायरल केल्यावर , उपरोक्त मुलीस त्या मुलांनी दम भरण्यास सुरुवात केली . ही केस महिला आयोगाकडे गेल्यावर , त्यांनी इंस्टाग्राम ला व दिल्ली पोलिसांना त्वरित वरील बाबींची माहिती वजा तक्रार दिली . पुढे काय ती प्रक्रिया कायदा ठरवेल .....परंतु दरम्यानच्या काळात जुना ग्रुप डिलीट केल्यावर त्या मुलांनी पुन्हा नवीन ग्रुप चालू केल्याचेही काही बातम्यांमधून पुढे कळाले. किती ती धिटाई आणि काय तो विक्षिप्तपणा......!!
वरील वाचलेली सत्यकथा ही प्रचंड भयावह आहे ... लहान सहान मुले एकत्र येऊन सोशल मीडियाचा असा वापर करीत असतील तर फारच वाईट दुःखदायक बाब आहे . " तंत्रज्ञान ही दुधारी तलवार आहे !" , " तंत्रज्ञान बरे की वाईट ? " असे एक ना अनेक निबंध लिहित मोठे झालेलो आम्ही वरील चित्र बघून , समाज कुठे चालला असल्याचे अंदाज बांधणे देखील अस्वस्थ करणारे वाटते....
मुळात अशा सर्व मुलांकडे फोन ,कम्प्युटर येतो तो पालकांकडूनच. पालकांनी मुलांना हवे ते तंत्रज्ञान देणे ! , एवढीच आपली जबाबदारी मानली आहे का ? असेल ! असे असेल , तर ही चूक मुलांची नसून पालकांचीच आहे असे जाणवते त्यात गैर ते काय?! आपल्या लहानपणी शाळेत " छडी "असायची . त्या छडी ची भारी धाक आमच्या पिढीला होता .. " छडी लागे छम छम विद्या येई घम घम !! " हे आपण गायलो आहे . आहे ना ? मग कुठे आहे ती छडी ? का नाही पालक तिचा वापर करत ? का नाही पालक मुलांशी संवाद साधत ? एखाद्या विषयांवरील चर्चा आजही आपण पालक , आपल्या मुलांशी खा नाही करू शकत ? का बरे एखाद्या विक्षिप्त गोष्टींबद्दल मुलांना (पाल्यांना) आकर्षण वाटत आहे ? घ्या पालकांनो जबाबदारी आपली आहे आणि ती झोकून चालणार नाही . दिल्ली मधील निर्भया रेप केस मध्ये नुकतीच फाशी दिलेले आरोपी , त्यातले काही नाबालीक होते ! आईवडिलां आपसांत जर संवाद साधला तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की पालकत्व हा काटेरी मुकुट आहे . तंत्रज्ञान प्रचंड वेगाने पुढे जात आहे , या तंत्रज्ञानाने विक्षिप्त भविष्य तयार होणार असेल तर ह्या मनाला प्रचंड अशांतता जाणवते आणि ते अस्वस्थ देखील वाटते......
अशा परिस्थितीत पालकांनो जागे व्हा !! असा हॅश टॅग वायरल करायला काय हरकत आहे ? नको ते #हॅश टॅग आपण व्हायरल करत असतोच की #Wakeupparents# मार्फत मोहीम राबविण्यात गैर ते काय ! ह्या अभियानांतर्गत आपल्या पाल्यांचे फोन तपासा , त्यांचे लॅपटॉप तपासा , समाजविघातक कृत्य तर त्यांच्याकडून होत नाहीये ना ! , हे तपासा . एखाद्या समाजविघातक कृत्याचे ते शिकार तर होत नाहीये ना ! हेदेखील तपासणी केली पाहिजे. आपली जबाबदारी आहे ती !! हेच तर आजच्या युगातील खरे पालकत्व ! मुलांना एखादे फळ खायला देतांना आपण दहा वेळा धुऊन त्याला देतो !! का नाही त्याचे फोन ,कम्प्युटर ,लॅपटॉप आपण तपासत ?? " मुलांना त्यांची स्पेस लागते ! " , " प्रायव्हसी लागते ! " , " त्यांच्यावर विश्वास हवा ! " ....हे सर्वमान्य !! तर मग आत्ता जे समाजामध्ये घडते आहे यांवर आपल्याकडे काही उत्तर आहे का ?? वरील ऐकलेल्या केसमध्ये आपणास कोण जबाबदार वाटते ?ती मुले की त्यांचे पालक ??
वरील लेख मी #जागे व्हा पालक #किंवा #Wakeupparents# नावाने प्रसिद्ध करण्यास काही हरकत नाही . वरील विचार हे लेखक डॉ. अमित नेमाणे यांचे वैयक्तिक विचार असून कोणा एका व्यक्ती विरोधी नाहीत . धन्यवाद !!
लेखक - डाॅ. अमित नेमाणे

True...an eye opener, every single word. Amazing doc..
ReplyDeleteNice thogts---- but pls make some son and daughters to be aware of parents ,write something about that too
ReplyDelete