लिहिते व्हा ......

लिहिते व्हा ......
               डॉ.अमित नेमाने

नमस्कार मित्रांनो ! अनेक दिवस एक विषय मनामध्ये खदखदतोय त्याला शब्द रूप देण्याचा मुहूर्त आज मिळाला मी गेले तीन ते चार वर्षे विविध विषयांवरील लेखन करीत आहे . अंगी असलेल्या लिखाणाचा गुण ,विषयाची दखल ,उत्स्फूर्तपणा ,सामाजिक संवेदनशीलता या सर्व गुणांमुळे ते मला शक्य होते विविध विषयांवरील लेखन केले अगदी वैद्यकीय शिक्षण ,त्याची परिस्थिती ,समाज प्रबोधन , टीकात्मक ,प्रोत्साहनपर वगैरे विषय आणि त्याहूनही अधिक विषय अगदी मार्मिक व वाचणाऱ्याला थेट भिडतील अशा भाषेत मांडले . साधारण 90 ते 95 टक्के वाचकांकडून फार सुंदर प्रतिसादा मिळाला त्यातल्या काहींनी तर वेळोवेळी माझ्या लेखांना प्रसिद्धी मिळण्याविषयी सल्लामसलत केली परंतु अगदी पाच ते दहा टक्के लेखांना प्रसिद्धी मिळाली किंबहुना लेखकांच्या लिखाणाला प्रसिद्धी मिळणे हा एक राजकीय डावपेचाचा भाग असल्याचे लक्षात आले ,लेखकाचे लेखन कितीही मार्मिक ,सुंदर असो  वाचकांशिवाय त्याला तसा अर्थ उरत नाही असे समाजप्रबोधनासाठी लिखाण करणाऱ्या माझ्यासारख्या लेखकाला वाटते
        तुम्ही लिखाण मेल करा ,पत्र पाठवा वगैरे वगैरे अनेक अपूर्ण संवाद माध्यमांच्या अनेक प्रतिनिधींशी झाले ,अगदी लेख हाती घेऊन अनेक वृत्तपत्रांची कार्यालय देखील झिजवली मात्र लेखनाच्या कॉलिटी विषयी बोलण्याऐवजी इतर निष्फळ चर्चा अधिक होते, तीही ह्याच मंडळींकडून ....मुळात प्रसिद्धीचा हव्यास हा माझा लेखक म्हणून अर्थातच हेतू नाही मात्र लिखाणाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे प्रोत्साहन मिळते ते वेगळेच आणि सतत नवनवीन लिहिण्याची आणि लिखाण करीत असताना विचारांची एक प्रचंड सुंदर मनोरंजक सफर घडते ती अगदीच अद्वितीय असते.
       तेव्हा आपल्या लिखाणाची "पाककृती "वाचक रुपी "खवय्यांना" आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकतो आणि वृत्तपत्रांपेक्षा ही कैक पटीने वाचक वर्ग हा सोशल मीडियावरती असतो या विचारानं नि माझ्या अनेक लेखकांचे, लेखन माणसांचे अशाच प्रकारे प्रकाशन करण्यात मी तूर्तास धन्यता मानतो .तरीही लिखाण वाचन या गोष्टींमुळे बुद्धीचा होणारा व्यायाम हा सर्वश्रुत आहेच  म्हणून प्रत्येक व्यक्तीने लिखाण ,वाचन करणे हे तितकेच गरजेचे आहे .व्हाट्सअप सारख्या माध्यमांमुळे पुस्तकरूपी वाचन जरी कमी असले तरी डिजिटल वाचन नक्कीच सर्वांचे वाढले आहे ,परंतु वाचन हे केवळ वाचना पुरते मर्यादित न राहता किंवा न ठेवता हातात एखादा पेन घेऊन किमान एखादा पान लिखाण प्रत्येकाने करून बघायला हरकत नाही लिखाण करताना लागणारी विचारांची तार ही खरंच तुम्हाला एक अजान शांतता आणि तितकाच गलबलाट देऊन जाते केवळ ह्या रंजक सफारीचा आनंद लुटण्यासाठी का होईना आपण लेखणी उचलणे मला गरजेचे वाटते.
      वाचन प्रगल्भ असेल तर लिखाण प्रगल्भ होते असे अनेक लेखक सांगतात ,उक्तीप्रमाणे वर्तन असावे .लिखाणाचा आणखी एक व्यापक फायदा असा की ज्या विषयांवर आपण कधीही विचार केलेला नसतो ,त्यावरही आपल्याला विचार करता येतो .आयुष्याच्या धक्का दुखित विचारांनी डोक्यात थैमान घातलेले असताना लिखाणासाठी बसणे आणि डोक्यातले विचार कागदावर उतरविणे म्हणजेच चातक पक्षाने बराच काळ पावसाची वाट बघितल्यानंतर अचानक एके दिवशी गारांचा पाऊस होणे आणि त्या गारा शक्य तेवढ्या वेचून घेणे असे मला तरी वाटते
    अगदी अशा एक ना अनेक अनुभवांसाठी मित्रहो लिहिते व्हा......
वरील लेख हा डाॅ. अमित नेमाणे यांचे वैयक्तिक विचार असून त्यांच्या नावासह पुढे फॉरवर्ड करण्यास काहीही हरकत नाही.....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बेसल इम्प्लांट तंत्रज्ञानाद्वारे केलेले कृत्रिम दंतरोपण हे दात नसलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.; दंतरोग तज्ञ डॉ अमित नेमाणे यांच्या कडून जाणून घेऊयात हे नवे तंत्रज्ञान.....

डॉक्टर निवडताना घ्या काळजी! --डॉ. नेमाणे

बदलते पालक आणि पालकत्व " - डाॅ अमित वा नेमाणे